कोल्हार ( वार्ताहर ) :- कोल्हार भगवतीपूर येथील यशराज अनिलराव खर्डे याने नुकतेच मुंबई येथील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज, नायर हॉस्पिटल येथून एमबीबीएस पूर्ण करीत सन २०२३ च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले.
डॉ. यशराज खर्डे याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण प्रवरानगर येथील प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कुलमध्ये झाले. त्यानंतर अकरावी आणि बारावीचे शिक्षण लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कॉलेजमध्ये झाले. त्यास माजी जि. प. सदस्य डॉ. भास्करराव खर्डे, प्रा. विलासराव खर्डे, दिवंगत प्रा. डी. यु. खर्डे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. नीट साठी नाशिक येथील श्री. आचार्य यांचे मार्गदर्शन मिळाले.
डॉ. यशराज खर्डे यांच्या यशाबद्दल महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी जि. प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील आदींनी अभिनंदन केले.




