सोनई (जनता आवाज वृत्तसेवा):- रामराज्य, म्हणजे सु-विचारांचे राज्य सांगत धर्मध्वज हा सततच उंच राहत असतो. बहुसंख्य भाविकांनी कथेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन हभप भास्करगिरी महाराज यांनी केले. प्रत्येकाने आपल्या श्रद्धेप्रमाणे देवाची उपासना करावी. देशप्रेम आणि धर्मप्रेमाचे पालन करावे. मुखाने रामनाम घेतल्याने जीवनाचे दुःख नाहीसे होत असल्याचे भास्करगिरी महाराज यांनी सांगितले.
सोनई येथे बुधवार दिनांक १८ पासून रामानाचार्य रामराव महाराज ढोक यांची तुलसी रामायण कथा कथेचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा वाजता भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी परिसरातील ह भ प मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती निमित्त आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीने या भव्य तुलसी रामायण कथेचे आयोजन जगदंबा देवी रंगनाथ करण्यात आले आहे यावेळी हभप वेदांताचार्य म्हस्के महाराज, हभप हभप कारभारी झरेकर, हभप पंढरीनाथ तांदळे, हभप कारभारी पंडित, हभप बाळकृष्ण सुडके, हभप तात्यासाहेब शिंदे, हभप नरवडे महाराज, हभप माऊली शिंदे, हभप नंदाताई गवारे, हभप साध्वी तुलसीदिदि हभप निवृत्ती लांडे, हभप शिवप्रसाद पंडित, हभप गोरक्षनाथ गायकवाड, हभप आकाश धाकतोडे, लतीफ शेख, हभप सदाशिव तोगे, आदी महाराज व वारकरी मंडळी तसेच नानासाहेब तुवर, सुनील गडाख यांच्यासह परिसरातील महाराज मंडळीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदयन गडाख यांनी केले व आभार नानासाहेब तुवर यांनी मांडले सूत्रसंचालन गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी केली.