नेवासा फाटा ( वार्ताहर ) :-नेवासा येथील वाळू तस्करी संदर्भात बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी यावर ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस यंत्रणा जागी झाली. त्यांनी वाळू तस्करावर कारवाई सुरू केल्यानंतर वाळू तस्करांनी पोलिसांना धक्काबुक्की करत कपडे फाडल्याची घटना घडली.
सोमवार (दि.१०) रोजीच्या एका दैनिकाच्या अंकात पत्रकार राजेंद्र वाघमारे यांनी ‘पालकमंञी विखे यांच्या आदेशाला ठेंगा’,नेवाशात अवैद्ध वाळू वाहतूक सुरु ! महसूल व पोलीसांचा छुपा आशिर्वाद अशा मथळ्याखाली सनसणाटी वृत्त अहमदनगर आवृत्तीमध्ये प्रसिद्ध करताच पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेत नेवासा,शेवंगांव,कोपरगांव आणि पारनेर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी देत वाळू उपसा बंद करण्याच्या सुचना दिल्यामुळे यापुर्वी वादग्रस्त ठरलेल्या आणि सध्या नेवासा पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या एका पोलीस शिपायांने पुन्हा एकदा एका जणाशी मोबाईलवरुन बोलतांना या शिपायाला त्याची वाळू का बंद केली रे… अशी विचारणा करताच वादग्रस्त पोलीस शिपाई सांगतो पञकार राजेंद्र वाघमारे यांनी बात्तमी लावल्यामुळे एकाचीच नाहीतर सर्वांचीच वाळू बंद केलेली आहे ते पण केवळ नेवाशाचीच नाहीतर सगळीकडेच बंद ठेवण्याचे साहेबांनी सांगितलेले आहे शिवाय या महीण्यात ‘त्या’ वाळूतस्तरांनी १० हजार रुपयेही कमी दिलेले असून महीनाही संपलेला असल्याचा सांगत वादग्रस्त संवादाची अॅडिओ क्लिप पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रसारित झाल्यामुळे पोलीसांच्या हप्तेखोरीचा विषय पुन्हा एकदा समोर आलेला असल्याने या अॅडिओ बॉम्बने नेवाशात खळबळ उडवून दिल्याची घटना समोर आली आहे
जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला या वादग्रस्त अॅडिओ बॉम्बची पुन्हा एकदा धुलवड उडवून खळबळ उडविण्याऱ्या पोलीसावर काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
नेवासा पोलीस ठाण्याचा कारभार हप्तेखाऊ पद्धतीमुळे अधिच बदनाम झालेला असतांना राज्याचे महसूलमंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी राधाकृष्ण विखे – पाटील यांनी यापुर्वी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष नेवासा दौऱ्यावर असतांना वाळू उपसा करणारी एक बोट पकडून देवून कामगार तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना निलंबित केलेले होते तरीही पुन्हा पोलीस आणि महसूलच्या छुप्या आशिर्वादाने वाळू उपसा सुरु असल्यामुळे दैनिक प्रभातमध्ये निर्भिड वृत्त प्रसिद्ध केल्याने पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील वाळूतस्करी बंद करण्याचा आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यामुळे नेवासा पोलीस ठाण्याच्या वादग्रस्त पेलीस शिपायाने या वार्ताचे संभाषण थेट इतरांना देत असल्याची अॅडिओ क्लिप प्रसारित झाल्यामुळे महसूल आणि पोलीसांच्या लाचखोरीचा कारभार पुन्हा एकदा उजेडात आलेला आहे.
या प्रकारानंतरही पुन्हा नेवाशात वाळूतस्करांचा कहर काही थांबलेला दिसत नसून नेवासा तहसिलदारांच्या निवासस्थानासमोर कारवाई केलेला वाळूने भरलेला डंपर पळवून नेण्याचा प्रकार घडलेलेला असून याप्रकरणी कामगार तलाठ्यांनी लेखी फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दिलेली असतांना दुसरी फिर्याद नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राहूल यादव व गायकवाड हे पोलीस शिपाई चोरुन वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी वाळूचे वाहन रोखले असता या पोलीसांना वाळूतस्करांनी शर्ट फाडून धक्काबुक्की केल्याची घटना समोर आलेली आहे त्यामुळे नेवासा पोलीसांच्या खाकीचा दरारा पुन्हा एकदा संपुष्ठात आलेला असून हस्तेखोरीच्या विळण्यात पोलीस आणि महसूल यंञणा अडकली असल्याचे प्रसारीत झालेल्या अॅडिओ क्लिप आणि पोलीस व महसूलच्या अधिकाऱ्यांनी पळविलेला डंपर आणि पोलीसांना झालेल्या धक्काबुक्कीच्या फिर्यादीवरुन पुन्हा एकदा समोर आल्यामुळे नेवासा पोलीसांना धक्काबुक्की आणि तहसिलदार निवासस्थानापासून डंपरच्या झालेल्या चोरीवरुन पुन्हा एकदा महसूल आणि पोलीसांच्या बेईज्जतीचा पाढाच सुरु



