लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले महत्व विचारात युवक- युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात येणार असून,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील वीस केंद्रावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्यातील योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असून या योजनेत सहभागी होण्यार्या युवक युवतीशी पंतप्रधान थेट संवाद साधणार आहेत.
राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करून १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून, त्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजनेच आहे.
महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली असून या सर्व वीस केंद्रांचे उद्घाटन दूदूरदृष्य प्रणाली द्वारे दि. २० सप्टे. २०२४ रोजी दु. १२-३० वा. प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या हस्ते होणार आहे.
या संकल्पनेचा अधिक लाभ शिर्डी मतदार संघात आणि परिसरातील जास्तीजास्त युवक युवतींना व्हावा, या दृष्टिकोनातून महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालीनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था प्रियदर्शनी महिला मंडळ जनसेवा फाउंडेशन या संस्थेच्या विवीध २२ महाविद्यालया मध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे त्याअंतर्गत ४० कोर्सेस मध्ये एकूण ११०० महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.असे संस्थेचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे यांनी सांगितले. आयटीआय कॅम्पस मधील आयटीआय, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोणी, प्रवरा ग्रामीण औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय (पदविका) या तीन शाखेमधील कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
या प्रसंगी चिंचपूर, निमगावजाळी, सादतपूर, औरंगपुर, गोगलगांव, चंद्रपूर, हसनापूर, दुर्गापूर, या गावातील मान्यवर आजी/माजी पदाधिकारी, विद्यार्थी पालक आमंत्रित केलेले आहे. संस्थेअंतर्गत पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय लोणी साञळ या ठिकाणी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कोलार या ठिकाणी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय त्याचबरोबर आश्वी, राहाता, अशा विविध स्तरावर या कार्यक्रमाचे नियोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. दिघे यांनी केले आहे.