11.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

गावठी कट्टासह सराईत गुन्हेगार जेरबंद श्रीरामपुर शहर पोलिसांची कामगिरी; 32 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

श्रीरामपुर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- श्रीरामपूर ते संगमनेर जाणाऱ्या रोडवर उभ्या असलेल्या सराईत गुन्हेगाराकडे गावठी कट्टा आढळून आल्याने त्याला श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर असेही की, दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री १०:४० वाजेच्या दरम्यान पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, श्रीरामपूर ते संगमनेर जाणाऱ्या रोडवरील जय भोले हॉटेलच्या बाजुला पृथ्वी ढाव्यासमोर, एक भगव्या रंगाचा स्पोर्ट टीशर्ट व बरमुडा पॅन्ट घातलेला एक इसम कमरेला गावठी कट्टा लावुन बसलेला आहे. तुम्ही आता गेल्यास तो मिळून येईल, अशी खात्रीशीर बातमी मिळाली आहे.

तुम्ही सदर ठिकाणी जावून बातमीप्रमाणे खात्री करुन त्याच्यावर कारवाई करा. असा तोंडी आदेश दिल्याने पोलीस पथक लागलीच दोन पंचांसह सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता एक भगव्या रंगाचा स्पोर्ट टीशर्ट व बरमुडा पॅन्ट घातलेला एक इसम बसलेला आढळून आल्याने त्याच्यावर छापा टाकुन त्यास जागीच पकडले.

सदरील आरोपीला नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश रामकरण विश्वकर्मा (वय 36 वर्ष, रा. स्वामी समर्थ कॉलनी सुतगिरणी रोड श्रीरामपुर, जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्यास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी पोलीस व पंचांची ओळख सांगुन त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्या 32 हजार रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा सिल्व्हर पांढऱ्या रंगाचा, काळया प्लॅस्टीक हॅण्ड ग्रिफवर स्टार कोरलेला असलेला मॅगझीन आढळून आले.

यावेळी संबंधित सराईत आरोपीला गावठी गट्टयासह ताब्यात घेवुन त्याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 899/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामाधान सोळंके हे करीत आहेत.

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!