23.1 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

छोट्या कल्पनांमधूनही मोठे संशोधन घडू शकते – कुलगुरु डाॅ.व्हि. एन. मगरे दोन दिवसीय परिषदेचा समारोप

लोणी दि.१५( प्रतिनिधी):-
आजच्या युगातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्व विषद छोट्या छोट्या कल्पनांमधूनही मोठे संशोधन घडू शकते. या परिषदेमध्ये सादर केलेल्या शोधनिबंधांमध्ये यश मिळविलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये शिस्तप्रिय राहून अभ्यासकेंद्रीत राहिले.

तरच यशाचा मार्ग मिळेल असे प्रतिपादन लोणीच्या अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.व्हि.एन. मगरे यांनी केले.

लोकनेते पद्मभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्रांतीकारी धारणा विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप प्रसंगी डाॅ.मगरे बोलत होते.
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्रांतीकारी धारणा या विषयावर राष्ट्रीय परिषदेचा समारोप समारंभासाठी डॉ. व्ही. एन. मगरे, संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,आदी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात डाॅ.मगरे म्हणाले, महाविद्यालयीन जीवनामध्ये शिस्तप्रिय राहून अभ्यासकेंद्रीत राहिले तरच यशाचा मार्ग मिळेल. तद्नंतर त्यांनी विज्ञानाने आपल्या जीवनात केलेल्या क्रांतीविषयी सांगितले, हे सांगतांना त्यांनी विविध क्षेत्र जसे संगणक, वैद्यकीय, दळणवळण इ. क्षेत्रातील प्रगतीची काही उदाहरणे दिली. विद्यार्थ्यांनी विचार करायला शिकणे ते विचार मांडण्याची कला अवगत करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी अंध अनुकरण टाळावे असे सांगितले.यावेळी डॉ. हिरेमठ यांनी या परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतूक केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः संश्याोधन कौशल्य आत्मसात करावे व समाजोपयोगी संशोधनावर भर देण्याचे आवाहन केले. परिषदेमध्ये सादर केलेल्या ओरल प्रेझेंटेशनमध्ये कु. शोभा मुसमाडे, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, प्रवरानगर यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये कु. मयुरी आरोटे, संगमनेर महाविद्यालय, संगमनेर या विद्यार्थीनींने प्रथम क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. प्रदिप दिघे यांनी केले.तर परिचय रसायनशास्त्र विभागाच्या प्रा. कु. अंजली विखे यांनी करुन दिला. सदर परिषद आयोजनामागील भूमिका विभागप्रमुख डॉ. गजानन पांढरे यांनी विषद केली तर या दोन दिवसीय परिषदेचा अहवाल समन्वयक डॉ. वैशाली मुरादे यांनी सादर केला. सदर परिषदेची स्मरणिका (सोव्हीनिअर) तयार करण्याकरिता प्रा. कैलास कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.सदर परिषद यशस्वीतेसाठी डॉ. रामचंद्र रसाळ, डॉ. अनिल वाबळे, डॉ. भाऊसाहेब रणपिसे, डॉ. प्रसाद डागवाले, डॉ. अनिल गाढवे, डॉ. बी. के. ऊफाडे, प्रा. दिलीप औटे, प्रा. कु. कमल चितळकर, प्रा. डॉ. श्रीकांत सुसर, डॉ. बाळासाहेब वाणी, बी. एफ. मुंढे, प्रा. साईप्रसाद कुंभकर्ण आदींनी सहकार्य लाभले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.पी.एल. हराळे यांनी केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!