आश्वी दि.१५ (प्रतिनिधी):-
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. माधुरी सुनील सातपुते यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नुकतीच विद्यावाचस्पती अर्थात पी. एच. डी. पदवी प्राप्त केली,
संगमनेर महाविद्यालय येथे विद्यावाचस्पती पदवी प्राप्तीसाठी अंतिम मौखिक परीक्षा संपन्न झाली.त्यांनी गुंजारव या संस्कृत त्रैमासिकाचे एक अध्ययन( १ ते ४० वर्षातील अंक) या विषयावर संशोधन केले. त्यांना डॉ. रूपाली कापरे यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशा बद्दल राज्याचे महसुल मंत्री व संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील. संस्थेच्या संचालिका सौ. लीलावती सरोदे, स्कुल कमिटीचे अध्यक्ष श्री. आण्णासाहेब भोसले प्राचार्य श्री. सयराम शेळके उप मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा वाणी यांनी अभिनंदन केल आहे.