जी लोक श्रीमंतांच्या यादीत गेलीत ती फक्त अगदी ठराविकच आहेत. त्या लोकांपासून आपण प्रेरणा घेऊन आपला व आपल्या सहकाऱ्याचा विकास निश्चित होऊ शकतो त्यासाठी ध्येय ठेवून काम करावे लागेल तेव्हाच यश मिळेल. असे प्रतिपादन ग्रोअॅप चे संस्थापक श्री. शेवाळे यांनी आश्वी येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय, येथे केले.महाविद्यालयातील भूगोल विभागाचा माजी विद्यार्थी तसेच ग्रोअॅप चे मुख्पकार्यकाकारी अधिकारी श्री. किशोर साबळे यांच्या मार्फत आणि वाणिज्य मंडळ यांचे वतीने ‘शेअर मार्केट मधील संधी’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली होती. या प्रसंगी डॉ. राम पवार व्यासपीठावर अध्यक्षस्थानी होते. समवेत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा जाधव, उपप्राचार्य देविदास दाभाडे, डॉ. आदिनाथ घोलप श्री. किशोर साबळे, श्री. ललित देवरे आदि उपस्थित होते.
ध्येय ठेऊन काम केल्यास यश मिळतेच. मा. श्री. यश शेवाळे
आश्वी दि.१५ (प्रतिनिधी):-
ग्रामीण भागातील मुलांनी स्मार्ट वर्क करून आर्थिक उत्पनाचे स्रोत वाढविणे गरजेचे आहे. फक्त पैसा कमविण्यापेक्षा पैसा वाढविणे याकडे आपला कल असावा. स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे.
आपल्या मार्गदर्शनात श्री. शेवाळे म्हणाले की, आरोग्याचे प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा येणाऱ्या खर्चाचा अंदाज कोणालाही येत नाही यासाठी आरोग्य विमा ही काळाची गरज ठरणार आहे. आरोग्य समस्याचे प्लानिंग होणे गरजेचे आहे. तसेच शेअर मार्केट मधून मिळणारा परतावा हा निश्चित स्वरूपाचा असतो. उद्योग व्यवसायाची निवड तरुणांनी करून आपला उत्कर्ष करावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देविदास दाभाडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी आहेर व प्रा. नीतू मांढरे यांनी केले तर आभार प्रा. लतीफ शेख यांनी मानले.सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.