शेवगाव ( प्रतिनिधी):-मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिला म्हणून सर्वत्र साजरा करीत असताना सर्वत्र लहान थोरापासून रोजे ( उपवास )हे मनापासून व आनंदी वातावरणात करताना दिसून येत असुन शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील सहा वर्षाच्या लहान मुलीने आज पहिला रोजा ठेवला.
असल्याने तिचे मनापासून कोड कौतुक करून अभिनंदन करताना दिसत आहे.
शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील फिदा हुसेन शेख सहा वर्षाची मुलगी आणि आज पहिला रोजा स्वेच्छेने केला असून या रमजान च्या उपासाच्या महिन्यामध्ये वृद्ध मंडळी हमखास उवपास करतात परंतु लहान मुले देखील उपास करण्यात काही कमी नसल्याचे यावरून दिसून येत आहे . या रमजानच्या महिन्यांमध्ये नमाज व कुराण पठण करून अल्लाहाची उपासना करतात . लहान मुलांना देखील रोजे ठेवण्यात चढाओढ असल्याने रोजी हे दिवसभरात सहजतेने निभावल्या जाते . परंतु यामागे लहान मुले देखील देवाची उपासना करून दुवा करतात .मनापासून उपासना केल्याने फळ हे निश्चितच मिळत असून अशा लहान चिमुकल्या मुलांनी रोजे ठेवल्याने त्यांचे कोडकौतुक करून अभिनंदनच केल्या जात आहे.