लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील गृहविज्ञान आणि संगणक महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण अर्थात प्रवेगा २०२३ निमित्त आयोजित कार्यक्रमात डाॅ.शितल देशमुख बोलत होत्या यावेळी.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा संस्थेच्या विश्वस्त सौ.शालीनीताई विखे पाटील होत्या यावेळी संस्थेचे संचालक कैलास नाना तांबे,सह सचिव भारत घोगरे,साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि अतांञिक विभागाचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,महाविद्यालयांच्या प्राचार्या डाॅ.अनुश्री खैरे, प्रवरा गर्ल्स इंग्लीश स्कुलच्या भारती देशमुख प्रा.राजश्री तांबे,प्रा.जया डबरासे,प्रा.संजय वाणी,क्रिडा अधिकारी डाॅ.उत्तम अनाप विद्यार्थी प्रतिनिधी दिव्या बेनके,वैशाली भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्ञान मिळवत पुढे जातांना केवळ पदवी न घेता त्या विषयात मास्टर बना – डाॅ.शितल देशमुख प्रवरेच्या गृहविज्ञान आणि संगणक महाविद्यालयांचे वार्षिक संम्मेलन
लोणी दि.१४ (प्रतिनिधी):-ज्ञान मिळवत पुढे जातांना केवळ पदवी न घेता त्या विषयात मास्टर बना. प्रवरा हे सहकार, क्रिडा, शिक्षण, आणि संस्कारांचे खरे केंद्र असून प्रवरेतून आत्मविश्वास मिळत असतो शिक्षणातून मोठं व्हा इतरांना प्रेरणा देत पुढे जा असे प्रतिपादन एन. जी. नारळीकर संशोधन केंद्र, पुणे येथील डॉ. शितल देशमुख यांनी केले.
आपल्या मार्गदर्शनात डॉ शितल देशमुख म्हणाल्या, प्रचरा शैक्षणिक संकुलात शिक्षण घेताना नेहमीचं प्रेरणा मिळत गेली. पदवी, पदवीनंतर मिळालेले ज्ञान त्याचं बरोबर मार्गदर्शन यामुळे मी घडत गेले. पुस्तकी ज्ञानाबरोबरचं जिद्द, चिकाटी, नाविण्याची ओढ आत्मनिर्भरता, आत्माविश्वास, प्रेम आणि जिव्हाळा मिळला. यामुळे प्रत्येक निर्णय बिनचूक ठरला. प्रत्येक गोष्टीत संधी आहेत त्या शोधुन पुढे जा आपण कोठेच कमी नाही जिद्द ठेवा निर्णय आपला आहे यश मिळणार आहे हा आत्मविश्वास ठेवा. जिद्दीने शिक्षण ध्या असे आवाहन डाॅ.देशमुख यांनी केले.
यावेळी सौ.शालीनीताई विखे पाटील म्हणाल्या,माजी विद्यार्थी हा प्रवरेचा आत्मा आहे. त्याच्यामुळेचं संस्था मोठी होत आहे. मुलीच्या सुरक्षित शिक्षणात प्रवरा शैक्षणिक संकुल अव्वल असून मुलींनी शिक्षणातून पुढे जावे हाच ध्यास संस्थेचा राहीला आहे. मैत्री करा मैत्री जपा हा संदेश देतानाचं मुलीनी शिक्षणातून पुढे जावे असे आवहन करुन नाविन्याचा ध्यास घ्यावा असे सांगून गृहविज्ञान विभागासह संगणक विभागात महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा गौरव केला.यावेळी विविध क्षेञात नेञदिपक यश संपादन केलेले प्राध्यापक,विद्यार्थीनीचा गौरव करण्यात आला.
प्रारंभी उपप्राचार्या राजश्री तांबे यांनी प्रास्ताविक तर प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे यांनी अहवाल वाचन तर प्रा. जया डबरासे यांनी आभार मानले.
प्रवरा हे आमच्या मुलीचे माहेर..,
प्रवरेत शिक्षण घेऊन आम्ही आज जगाच्या पाठीवर आहोत. संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी संघटनेद्वारे आम्हाला माहेरी आल्या सारखे वाटते. सतत मिळणारी प्रेरणा, होणारा गौरव,मिळत असलेले व्यासपीठ यामुळे प्रवरा हे आमच्या मुलीसाठी माहेर आहे. प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा मिळतो. अशी भावुक प्रतिक्रिया डॉ. देशमुख यांनी दिली.