लोणी (प्रतिनिधी ):-शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नीतिमंत्र तरुणांना देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती लोणी येथे साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त लोणी येथे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. लोणी बुद्रुक लोणी खुर्द येथील तरुण भीम मित्रांनी मोटर सायकल रॅली चे आयोजन केले.
लोणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पा., माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा., सिनेट सदस्य अनिल विखे पा., माजी उपसरपंच अनिल विखे पा., उपसरपंच श्री गणेश विखे पा., लक्ष्मण विखे पा., नितीन ब्राह्मणे, गोकुळ ब्राह्मणे, याचबरोबर अनेक आरपीआय अनेक कार्यकर्ते यावेळी हजर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करण्यात आली. त्यामुळे लोणी येथील सर्व वातावरण हे चैतन्य मुळे झाले होते.