spot_img
spot_img

#डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती_१४_एप्रिल_विनम्र_अभिवादन_🙏

#डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती_१४_एप्रिल_विनम्र_अभिवादन_🙏
¶ विश्वरत्न, भारतरत्न , महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मित, समाजसुधारक, क्रांतीसुर्य, युगपुरुष, बोधीसत्व, कर्मयोगी, ज्ञानमहर्षी, तत्वज्ञानी, पत्रकार, संशोधक, जलशास्र, नागरिक शास्त्र, शिक्षण शास्त्र, इतिहास शास्त्र, नितीशास्र, कायदाशास्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, बहुश्रुत, बहुआयामी,अष्टावधानी, मानवतेचे पुजारी, महामानव, परमपूज्य बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी प्रणाम…🙏
आज १४ एप्रिल … भारतमातेचे थोर सुपूत्र डाॅ. भिमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती…. आजच्या या प्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलीक विचारांचे आपल्या जीवनात  आचरण करण्याचा संकल्प सोडला तर त्यांचे खऱ्या अर्थाने पुण्यस्मरण केले असे म्हणता येईल…. बघा…. अंतर्मुख होऊन विचार करा…. त्यांच्या या मौक्तिकासम असलेल्या अमृतरुपी विचारपुष्पातुन आपल्याला काही आत्मचिंतन करुन काही अंगिकारता येईल का ते !!! 🙏
¶ अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘”हुकूमशाही” आणि माणसां-माणसांत भेद मानणारी तथाकथीत ‘”धर्म – संस्कृती”.
¶ तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.
¶ देवावर अवलंबून राहू नका…. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.
चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.
¶ उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.
¶ बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.
धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तर तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे.
¶ शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !
तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे.
¶ मला स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.
सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.
¶ आयुष्य मोठे होण्याऐवजी महान असले पाहिजे.
जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही.
¶ माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल,आणि ज्याला लढायचे असेल त्याला
अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे.
¶ मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा, छोट्या गोष्टींने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.
जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.
¶ जेथे एकता तेथेच सुरक्षितता असते. 
माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी. 
¶ काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका. 
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो
¶ भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा कधीच केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय / लवचिकता त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही…..भरभक्कम. चौकटीतील दरवाजे न उघडल्यामुळेच मला दुसरे घर शोधणे भाग पडले. 
जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही आणि दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी ठेवतात तसेच  ज्याला स्वाभिमान आहे तोच माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो.
¶ माणसाशी नव्हे तर माणसातल्या पशुत्वाशी माझा लढा आहे आणि  माझ्या इच्छेविरुद्ध मला हा लढा लढण्यास भाग पाडले गेले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!