टाकळीभान (प्रतिनिधी ) :-श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील बसस्थानक परिसरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती आज मंगळवार दि.११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
टाकळीभान बस स्थानक परिसरात क्रांतीसुर्यमहात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी
प्रारंभी बँड पथकाच्या गजरात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात नंतर सर्वपक्षीय व टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करून अभिवादन करण्यात आले.
जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आयोजकांनी कुठल्याही प्रकारची वर्गणी न करता समाज बांधवांनी स्वत: ही जयंती साजरी केली असल्याने ग्रामस्थांनी आयोजकांचे कौतूक केले. तसेच याच पध्दतीने इतरही महापुरूषांच्या जयंत्या साजर्या करण्याचा पायंडा पाडावा असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी नानासाहेब पवार, ज्ञानदेव साळूंके, मंजाबापू थोरात, राजेंद्र कोकणे, शिवाजी शिंदे, उपसरपंच कान्हा खंडागळे, मयुर पटारे, राहुल पटारे, प्रा. कार्लस साठे, अविनाश लोखंडे, भाऊसाहेब पवार, यशवंत रणनवरे, पाराजी पटारे, प्राचार्य बी.टी.इंगळे, दादासाहेब कोकणे, दत्तात्रय नाईक, भाऊसाहेब मगर, विलास दाभाडे, बापूसाहेब शिंदे, सोमनाथ पाबळे, बबलू वाघुले, सुभाष जगताप, सुनिल बोडखे, प्रकाश धुमाळ, संजय पटारे, देवा पाबळे, भाऊसाहेब पटारे, मोहन रणनवरे, शंकरराव पवार, रावसाहेब वाघुले, महेश लेलकर, भारत गायकवाड, बाळासाहेब शेळके आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंती उत्सव  मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी महात्मा ज्योतीबा फुले उत्सव समिती व संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा समितीचे सर्व सदस्यांनी विषेश परिश्रम घेतले. 




