spot_img
spot_img

बेलपिंपळगाव गटातील कार्यकर्त्यांनी केला आ शंकरराव गडाखांच्या विजयाचा निर्धार आ. शंकरराव गडाख यांच्या प्रवरासंगम येथील निर्धार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद : शेकडो युवकांचा पक्षप्रवेश

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ): – महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासह संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला रास्त भाव मिळवून देणारे सरकार स्थापन करण्यासाठी जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन आ. शंकरराव गडाख पाटील यांनी केले आहे. 

नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील हिरा मंगल कार्यालयात आयोजित निर्धार मेळाव्यास संबोधित करताना आमदार गडाख बोलत होते. या निर्धार मेळाव्यास बेलपिंपळगाव गटातील ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मेळाव्याच्या प्रारंभी मोठ्या संख्येने उपस्थित युवकांनी आमदार गडाख यांचे ढोल ताशांच्या गजरात, फटाक्याच्या आतशबाजीत तोफांची सलामी देऊन उत्स्फूर्त स्वागत केले. युवा उद्योजक राजेंद्र दिनकर कदम यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.

यावेळी निर्धार मेळाव्यास उपस्थित प्रचंड जनसमुदायासमोर बोलताना आमदार गडाख पुढे म्हणाले की, माझ्याबद्दल गैरसमज पसरविणाऱ्या विरोधकापासून तालुक्यातील जनता तसेच कार्यकर्त्यांनी सावध राहणे गरजेचे असून उपस्थित सर्वजण गटतट विसरून या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलात यातच आपले खरे यश असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. मोठेपणाकरीता नव्हे तर आपल्या तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, बेरोजगारी, शेतकरी व युवकांचे हित जपण्यासाठीच मला आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी परत आमदार व्हायचा निर्धार करणे सोपे नसल्याचे नमूद करून पुन्हा संधी दिल्यास तालुक्यासाठी आतापेक्षा डबल कामे करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी जाहीर करून तो पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. सकारात्मक पद्धतीने प्रश्न सोडविण्यासाठी आपला नेहमीच प्रयत्न राहिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट करून, मात्र कोटयावधी रुपये खर्चाच्या असंख्य मंजूर कामांना महायुती सरकारने राजकीय द्वेशातून स्थगिती दिल्यानेच तालुक्यातील वीज, पाणी, रस्त्यांसह विविध विकास कामांना खिळ घालण्याचा प्रयत्न झाला आहे हे समजून घेण्याचे आवाहन आमदार गडाख यांनी केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्रीपद देऊन तालुक्याला न्याय दिला, त्यांनी दिलेल्या संधीमुळेच आपल्या विश्वासाच्या बळावर मी उबाठा मध्ये आहे, लोकसभेत युवक, शेतकरी नागरिकांनी महाविकास आघाडीला कौल दिल्यामुळे घवघवीत यश मिळाल्याचे नमूद करून येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी झटून कामाला लागण्याचे आवाहन आमदार गडाख यांनी केले.

निर्धार मेळाव्याच्या प्रसंगी गोगलगाव येथील हभप दिनकर महाराज मते, उद्योजक दिनकरराव कदम,जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डीले, संचालक बाळासाहेब पाटील, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब शिंदे, बेलपिंपळगावचे सरपंच कृष्णा शिंदे, दिगंबर शिंदे, डॉ.अशोक ढगे, शिवाजीराव मते,निलेश शेळके,बाळासाहेब साळुंके,बाळासाहेब आहेर,बाळासाहेब तनपुरे, प्रवरासंगमचे सरपंच संदीप सुडके,काशिनाथ नवले,सरपंच अझर शेख,बाळासाहेब निकम, अशोकचे संचालक अमोल कोकणे,दत्तात्रय शेळके,खेडले काजळीचे सरपंच बाळासाहेब कोरडे, बाळासाहेब शिंदे,सरपंच कांताकाका जोशी,प्रकाश पांडव,विष्णु जाधव,सुनील खंडागळे, अशोक नांगरे चेअरमन,नवनाथ पटारे,पंचायत समिती सदस्य रविंद्र शेरकर, आदिनाथ जाधव,प्रल्हाद मते,व्यापारी रमेश ललवाणी,सदाशिव बहीरट,प्रभाकर पटारे,नितीन भालेराव,जळके खु सरपंच राजेंद्र पंडित, नितीन लहिरे,पोपटराव गव्हाणे, योगेश म्हस्के,दिलीप मते,हबीब शेख,संजय लोखंडे,यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बेलपिंपळगाव गटातील युवक व शेतकऱ्यांच्या वतीने आमदार शंकरराव गडाख यांचा गुलाबपुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तर सदरच्या निर्धार मेळाव्याच्या प्रसंगी गोधेगाव येथील चेअरमन नवनाथ पठाडे, माजी सरपंच राजेंद्र गोलांडे, रशीद पटेल, टोका येथील कडूबाळ रासने, खेडले काजळी येथील साईनाथ शिरसाठ, धामोरी येथील गणेश पटारे, बेलपिंपळगाव येथिल चंद्रशेखर गटकळ,मा सभापती वसंतराव रोटे यांनी आमदार शंकरराव गडाख हेच आम्हाला पाणी वीज,रस्ते या महत्वाच्या प्रश्नांवर न्याय देऊ शकणार असल्याने त्यांना येत्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्य बेलपिंपळगाव गटातून देण्याचा निर्धार आपल्या भाषणातून बोलतांना व्यक्त केला.

यावेळी गोगलगाव येथील कुनाल शिवाजी मते, अभि राजेंद्र मते, रोहीत दत्तात्रय गवांदे, भैय्या दत्तात्रय घालमिले, गणेश दिलीप म्हस्के, काकासाहेब रामनाथ मते, गोविंद रमेश मते,सार्थक रविंद्र कोहक, राहूल धांगुनाना म्हस्के, महेश काकासाहेब घालमीले, अभि दत्तात्रय गवांदे, अजित बन्सी अंधारे, योगेश दिलीप कोहक, कृष्णा कोहक, तसेच घोगरगाव सोसायटीचे माजी चेअरमन माधव बहिरट, मंगळापूरचे सचिन एकबोटे, गोधेगावचे हनुमंत नरोडे, अक्षय पारखे, प्रमोद साठे, आदिम शेख, मेहेबूब शेख, भगवान पवार, शाम पठाडे, बबलू साठे, बाबासाहेब पठाडे, विजय पठाडे, सरताज शेख, सुरेश दाणे, गणेश निमसे, मयूर पठाडे, सोमनाथ शेळके आदींनी आमदार गडाख यांच्या नेतृत्व स्वीकारत शिवसेनेच्या उबाठा गटात यावेळी जाहीर प्रवेश केला.

यावेळी झालेल्या निर्धार मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या युवक, शेतकरी, शेतमजूर यांच्यासह उपस्थित हजारो नागरिकांचे उद्योजक प्रा.सागर कदम यांनी आभार मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!