spot_img
spot_img

‘ पोटखराब ‘ क्षेत्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबविणार. – मयुर पटारे

टाकळीभान दि. 13(प्रतिनिधी ):-गावातील काही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद पोटखराब अशी आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी पोटखराब जमीन लागवडयोग्य केली असेल त्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर जमिनीची नोंद लागवडयोग्य जमीन अशी केली जाणार आहे.त्यासाठी लोकनेते माजी आमदार आदरणीय श्री.भानुदासजी मुरकुटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे मयुर पटारे यांनी सांगितले. 

अनेक शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पोटखराब क्षेत्राचा उल्लेख असल्याने शेतकऱ्यांना बँका कर्ज देत नाही. शिवाय विमा कंपन्यांही पिकांना विमा संरक्षण देत नव्हत्या. शासकीय योजनांसाठी होणाऱ्या भूसंपादनातही शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांनी पोटखराब जमिनीचे रूपांतर लागवडयोग्य जमिनीत केले आहे त्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील नोंद बदलण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन विक्री करताना फायदा होईल. तसेच त्यांना बँकेचे कर्जही वेळेत मिळेल असे ते यावेळी म्हणाले. 

या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी आज पोटखराब धारक शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालय, टाकळीभान येथे बैठक पार पडली. 
या बैठकीसाठी माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, दत्तात्रय नाईक, शंकर पवार, यशवंत रणनवरे, भाऊसाहेब पटारे, शिवाजी पवार, भागवत रणनवरे, पाटीलबा पटारे, भैय्या पठाण, केरू जाधव, विशाल पटारे, बंटी पटारे, संदीप पटारे, अप्पासाहेब चौधरी, दीपक रणनवरे, सोमनाथ रणनवरे, अशोक गांगुर्डे, ज्ञानेश्वर सलालकर, किरण सलालकर आदी शेतकरी उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!