नेवासा फाटा( प्रतिनिधी ):- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र हंडि निमगाव येथील सालाबाद प्रमाणे प्रसिद्ध असलेल्या नाथांची  जत्रा भरत असते. निमित्ताने आज सकाळीच कावडीने आणलेले पाणी नाथांच्या मूर्तीस जलाभिषेक केला. त्रिवेणीश्वराचे मंदिरापासून वाजत गाजत  मिरवणूक झाली
.त्रिवेणीश्वराचे महंत रमेश रमेशनंदगिरीजी, मध्यमेश्वर येथील महंत ऋषिकेश यांचे शुभ हस्ते  ध्वजारोहण झाले.
  मंदिर परिसरामध्ये झालेल्या कार्यक्रमात महंत रमेशानंद गिरीजी म्हणाले की, धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या हंडि निमगाव मध्ये नाथांच्या जत्रेचा उत्साह मोठ्या थाटामाटात होत असतो. यामध्ये सर्व धर्मीय समाजातील कुटुंब एकत्र येऊन हा सोहळा शांततेत पार पाडतात. याचा अभिमान वाटतो. त्यांच्याच कृपेने गावातील शांतता, समन्वय  असून सर्वजण एकत्र येऊन सन्मानाने राहत असतात. असेच कार्यक्रम यापुढेही सुरू ठेवू अशी अपेक्षा व्यक्त केली.
 याप्रसंगी भिवाजीराव आघाव, कल्याणराव उभेदळ, पांडुरंग उभेदळ, बाळासाहेब साळुंके, अण्णासाहेब जावळे, कुंडलिकराव चिंधे , मच्छिंद्र साळुंके,भागचंद पाडळे, विठ्ठल पाषाण, कल्याणराव पिसाळ, एकनाथ पिटेकर, मनोहर जाधव, दिगंबर जावळे, परसराम कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
 यात्रा कमिटीचे विठ्ठल पिटेकर, रघुनाथ पिटेकर, महेंद्र पवार,नवनाथ गुंजाळ, बाळू आळकुटे, संजू पिटेकर, दगडू पिटेकर, आदी परिश्रम घेत आहेत.
 सायंकाळी मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, किर्तन,अन्नदान होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.




