spot_img
spot_img

जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदीरचे यश

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-  जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा पदमश्री डॉ विखे पाटील सैनिक स्कुल प्रवरानगर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध शाळांतील एकूण १४० स्पर्धक जलतरण पट्टूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणीच्या जलतरण पटूंनी उत्कृष्टपणे खेळाचे प्रदर्शन करुन २५ सुवर्णपदक, १३ रौप्यपदक, ७ कांस्यपदक पटकावले. यशस्वी खेळाडूंना जलतरण प्रशिक्षिका सुचित्रा तांबे , क्रीडा शिक्षिका फुटबॉल कोच विद्या घोरपडे तसेच हॉकीच्या कोच कल्पना कडू यांचे मार्गदर्शन लाभले. 

खेळाडूंचे खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्रीना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे, प्राचार्य भारती कुमकर यांनी अभिनंदन केले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!