10.7 C
New York
Thursday, October 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्रांतीकारी ही महत्वपुर्ण सौ.शालीनीताई विखे पाटील विखे पाटील विद्यालयात कार्यशाळा

लोणी दि.१२( प्रतिनिधी):- विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्रांतीकारी ही महत्वपुर्ण आहे. दोन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून व्यापक मंथन होऊन यांचा उपयोग भविष्यासाठी महत्वपुर्ण ठरले असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि संस्थेच्या विश्वस्त सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय आयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्रांतीकारी धारणा या विषयावर राष्ट्रीय परिषदेच्या शुभारंभ प्रसंगी सौ.विखे पाटील बोलत होत्या.यावेळी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथील शास्ञज्ञ डॉ.पी.पी. वडगावकर,संस्थेचे सह सचिव भारत घोगरे, प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.
  आपल्या मार्गदर्शनात सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या, संशोधक, शिक्षक व विद्यार्थ्यांना वरील परिषदेच्या निमित्ताने ज्ञानार्जनाची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल महाविद्यालयाचे कौतूक केले. विज्ञानाने आपली बौध्दिक क्षितीजे वाढत आहे. या ठिकाणी आलेले मान्यवर, संशोधकांच्या मार्गदर्शनामुळे निश्चितच सर्वांना लाभ होईल. विकास हा पर्यावरणपुरक असावा, असे त्यांनी आग्रहाने नमूद केले. या मुद्याचा आग्रह धरतांना, त्यांनी जनसेवा फौंडेशनच्या वतीने तयार करण्यात येत असलेल्या ऑरगॅनिक अगरबत्त्या, पेन्सिल, खडू, सॅनिटरी नॅपकीन इ. उत्पादनांची उदाहरणे दिली. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेक क्षेत्रात आपल्या बुध्दीच्या जोरावर स्वतःचा व संस्थेच्या नावलौकिकामध्ये भर घालत आहेत.
    आपल्या मनोगतामध्ये मा. डॉ. प्रकाश वडगावकर यांनी सांगितले की, आजच्या युगातील विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व विषद करतांना सांगितले की, तंत्रज्ञानाने आपले जीवन सुरक्षित आणि सोयीचे केले आहे. तांत्रिक विकास हा आजच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. तंत्रज्ञानाला विज्ञानाची साथ मिळाल्याने मनुष्य जीवनामध्ये अनेक बदल झाले आहे. त्यांनी हा मुद्दा विषद करतांना कोरोना व्हॅक्सीनचे उदाहरण दिले. ज्या वेगाने ही व्हॅक्सीन तयार करण्यात आली, तेथेच आपणांस विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्व समजते. अमेरिकेसारखा देश हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आज जगात पुढे आहे. सध्या भारतही अनेक तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत असून, आणखी वेगवान प्रगतीची तरुण वर्गाकडून अपेक्षा व्यक्त केली. आज मानवतेला पर्यावरण बदल, ओझोन थर कमी होणे इ. समस्यांना तोंड देत आहे. यावर विज्ञान आणि तंत्रज्ञानच मार्ग काढु शकते. आपल्या भाषणात त्यांनी आंतरविद्याशाखीय शिक्षण घेण्याची आवश्यकता विषद केली.या परिषदेच्या निमित्ताने मान्यवरांच्या शुभहस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. प्रदिप दिघे यांनी केले. विषद केली. सदर परिषदेची भूमिका परिषदेच्या समन्वयक डॉ. वैशाली मुरादे यांनी रसायनशास्त्र विभागाचे डॉ. कैलास कदम यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. तसेच रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गजानन पांढरे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!