spot_img
spot_img

भोसे गावचे प्रगतशील शेतकरी डॉ.शशिकांत शिंदे कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित 

पाथर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात भोसे येथील प्रगतशील शेतकरी डॉ.शशिकांत भरतराव शिंदे यांचा नुकताच कृषी रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने दरवर्षी राज्य कृषी विभागाच्यावतीने राज्यातील विविध गावच्या प्रगतशील शेतकऱ्यांचा कृषी रत्न पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.

यावर्षी राज्याचे राज्यपाल पी.सी.राधाकृष्णन यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये डॉ.शशिकांत शिंदे यांना हा पुरस्कार संपत्नीक देण्यात आला.भोसे गावचे नाव शेती तंत्रज्ञानात सर्वोच्च पटलावर घेऊन जाण्याचे काम डॉ.शिंदे यांनी केले असून शेतीमध्ये विविध तंत्रज्ञान व वेगवेगळे संशोधन करून फलोत्पादनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणारे कृषीरत्न डॉ.शशिकांत भरतराव शिंदे यांना मिळालेल्या कृषीरत्न पुरस्काराबद्दल टेमकर महाराज,शिंदे महाराज,फसले महाराज,सरपंच विलास टेमकर,युवानेते अशोक टेमकर,माजी उपसरपंच संदीप साळवे यांच्यासह भोसे ग्रामस्थांनी डॉ.शशिकांत शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!