लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल लोणी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुष्मिता ताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात नियोजन केलेला आजी- आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
प्रत्येक कुटुंबातील आजी-आजोबांचे महत्त्वाचे स्थान, त्यांच्याद्वारे केलेले संस्कार, व त्यांचे नातवंडाप्रती असलेले प्रेम याची जाणीव होऊन आजी-आजोबांना त्यांच्या म्हातारपणातून बालपणात घेऊन जाणे व त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देणे हा उद्देश या मेळाव्याचा होता.
यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालच दत्ताञय खर्डे, संपतराव विखे पाटील तंटामुक्ती सदस्य , संजय आहेर , पोपटराव वाणी, माणिक रामभाऊ गोरडे,डाॅ.अण्णासाहेब तांबे,प्राचार्या रेखा रत्नपारखी आदी मान्यवर उपस्थित होते.
आजी-आजोबांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या मनोरंजनासाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमाचे ‘भाग्यवान आजी’ आणि ‘आजोबा’ यांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आले.



