spot_img
spot_img

प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ  विविध कार्यक्रमाचे ही आयोजन

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-  प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये शारदीय नवरात्र महोत्सवाचे सहकारातून समृद्धीकडे यानुसार आयोजन करण्यात आलेले आहे. नवरात्र उत्सवास संस्थेच्या सी ई ओ डॉ. सुष्मिता विखे यांच्या शुभहस्ते मुख्य इमारतीमध्ये घटस्थापना करत प्रारंभ झाला.

नवरात्र उत्सव विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि नागरिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये ९ आणि १० आॅक्टोबरला भव्य गरबा आणि दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्व विद्यार्थी,पालक, शिक्षक,शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. यानिमित्ताने विद्यार्थी पालकांनाही मनोरंजनाचा आनंद मिळणार आहे. तसेच विजयादशमीच्या दिवशी रावणदहनाचा कार्यक्रम ही पार पडणार आहे. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी दिली.

घटस्थापनेच्या प्रसंगी संस्थेच्या सीईओ डॉ. सुष्मिता विखे,प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे,उपप्राचार्य श्री. के टी अडसूळ,पर्यवेक्षिका सौ. एम एस जगधने, सौ. शुभांगी रत्नपारखी व विद्यार्थी उपस्थित होते.

या निमित्ताने सहकारांतून समृद्धीकडे या देखाव्यांच्या निर्मितीसाठी शाळेचे कलाशिक्षक संजय तुपे आणि प्रज्वल भगत यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!