संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत तीसरीच्या वर्गात शिकणाऱ्या तब्बल पाच मुलींचा शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतही अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पालकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी असभ्य वर्तन केल्याने शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारच्या सुट्टीत एक मुलगी रडत रडत घरी गेली आणी घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर हे समोर आलं आहे.
शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी अशाच प्रकारे इतर चार ते पाच मुलींबरोबरही बाळशीराम बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदर शिक्षकावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.



