मुंबई( जनता आवाज वृत्तसेवा):- टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना मुंबईतील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. 86 वर्षीय रतन टाटा हे गेल्या काही दिवसात हॉस्पिटलला तपासणीसाठी जात होते आणि त्यांनी सांगितले होते की, त्यांची वय आणि संबंधित आरोग्य स्थिती लक्षात घेऊन त्यांची हॉस्पिटलची भेट ही नियमित वैद्यकीय तपासणीचा एक भाग आहे.
आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे निधन झाले आहे.रतन टाटा हे भारतीय उद्योग क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व होते. ते 1991 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावशाली समूहांपैकी एक असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष बनले आणि 2012 पर्यंत त्यांनी समूहाचे नेतृत्व केले होते.
रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय व्यापार विश्वात शोकाकुल वातावरण निर्माण झाला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.