पारनेर तालुक्यातील आवधुप या गावात श्रीक्षेत्र खंडेश्वराच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते असे म्हणाले की पारनेर तालुक्याचा विकास ही काळाची गरज असून यापूर्वी या भागात वाळू माफिया तसेच गाव गुंडाचा कारभार हा सर्रास सुरू होता, मात्र राज्यातले सरकार बदलले आणि आता सर्वसामान्य शेतकरी, शेतमजुराचं हे सरकार आलं आहे, हे सरकार येताच राज्याचे महसूल मंत्री तथा आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे स्वप्नवत असलेल्या वाळू तस्करी विरोधात घेतलेला निर्णय हा सर्वसामान्यांचा तसेच आपल्या माता – भगिनीचा सुरक्षितेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. एवढेच नाही तर या वाळू माफियांकडून होणारी मुजरी आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक असुरक्षितता यावर आता अंकुश लागणार आहे. हा निर्णय घेत असताना विखे पाटील कुटुंबाला अनेक धमक्या आल्या तसेच प्रलोभाने देण्यात आली मात्र विखे पाटील कुटुंबांनी कायम सर्वसामान्यांचा विचार तसेच आपल्या माता भगिनिंच्यां सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. या नवीन वाळूधरणामुळे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलासाठी पाच ब्रास वाळू ही देखील मोफत देण्यात येणार आहे .याबरोबरच महसूल विभागाने अहमदनगर जिल्ह्यासाठी पथदर्शी प्रकल्पातून आपल्या जमिनीची मोजणी ही देखील मोफत आणि केवळ दोन महिन्यात पूर्ण करून देण्या संबंधी निर्णय घेतला आहे. यासारखे अनेक सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय राज्यातले शिंदे फडणवीस सरकार हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून घेत असून याचा फायदा गोरगरीब जनतेसह जिल्ह्यातील सर्वसामान्य होत आहे. या भागातील जनतेने कायम विखे पाटील कुटुंबावर प्रेम केले असून विखे पाटील कुटुंबाकडून देखील त्यांचा विश्वासास तडा जाऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही यावेळी खासदार विखे यांनी उपस्थितांना दिली.
स्वच्छ प्रतिमेचे लोक राजकारणात आले तर तालुक्याचे भविष्य हे उज्वल – खा.डॉ.सुजय विखे पाटील
पारनेर ( प्रतिनिधी ):-स्वच्छ प्रतिमेचे लोक राजकारणात आले तर तालुक्याचे भविष्य हे उज्वल आहे. राजकारणामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील तसेच गोरगरिबाला काम करण्याची संधी दिली तर निश्चितपणाने त्या भागाचा विकास हा शंभर टक्के होतो असे मत खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी विश्वनाथ कोरडे पाटील,वसंतराव चेडे,सागर्जी मैंद,राजेंद्र रोकडे, यांच्या सह भाजप पदाधिकारी, ज्येष्ठ नेते यांची प्रमुख उपस्थिती होती.
खंडेश्वराच्या यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
भैरनाथ ट्रस्ट अन्नछत्रासाठी २५ लक्ष रुपये निधी
जातेगव येथील श्री क्षेत्र भैरवनाथाचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दर्शन घेवून ग्रामस्थांशी संवाद साधला असता ग्रामस्थांनी विविध विकास कामासाठी निधीची मागणी केली त्याच बरोबर मंदिर ट्रस्टच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या अन्नछत्रा साठी २५ लक्ष रुपयाचा निधीची मागणी करताच तो देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.