18.3 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपूर शहर कॉँग्रसच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा  समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- शहर कॉँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती, युवा कॉँग्रेस आघाडीचे माजी शहराध्यक्ष संजय गांगड व शहर कॉँग्रेसचे विधानसभा समन्वयक प्रविण काळे व मातापूरचे माजी सरपंच बाळासाहेब दौंड यांच्यासह अनेक समर्थकांसह मुंबईत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. कॉँग्रेसमध्ये अंतर्गंत चाललेल्या वादामुळे कॉँग्रेसच्या जुन्या पदाधिकाºयांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे बोलले जाते.

मुंबईत काल शिवसेनेची (शिंदे गट) बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस खा.श्रीकांत शिंदे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, संपर्कप्रमुख राजेंद्र चौधरी, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, जिल्हाप्रमुख नितीन औताडे उपस्थित होते. यावेळी शहर कॉँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती, कॉँग्रेस युवा आघाडीचे माजी शहराध्यक्ष संजय गांगड व शहर कॉँग्रेसचे विधानसभा समन्वयक, युवक कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रविण काळे, मातापूरचे माजी सरपंच बाळासाहेब दौंड, सदाशिव उंडे, प्रगतशील शेतकरी मनोज होंडे, गोकुळ गायकवाड, शरद पंडित, कलारत्न युथ फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश कदम आदींनी असंख्य समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

खा. शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्यांचे स्वागत करून सन्मान केला. यावेळी खा. शिंदे म्हणाले, शिवसेना पक्ष हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार काम करणारा पक्ष आहे. राज्यातील महायुती सरकार सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी कटीबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करत आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या आहेत, त्या योजना सामन्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!