महसूल मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील याच्या संकल्पनेतून लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रवरा मंथनचे विमोचन माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,संस्थेचे संचालक, संपादकीय सदस्य सर्वश्री सौ. लिलावली सरोदे, प्रा गिरीश सोनार, प्रा. नंदकुमार दळे, प्राचार्या भारती देशमुख, प्रा. दिपक डेंगळे याप्रसंगी उपस्थित होते.
गुणवतापूर्ण शिक्षण देतानाच प्रवरा शैक्षणिक संकुलातून साहीत्य,संस्कृती कला अविष्कारालाही प्रोत्साहन -सौ.विखे पाटील
लोणी दि.८ (प्रतिनिधी):-गुणवतापूर्ण शिक्षण देतानाच प्रवरा शैक्षणिक संकुलातून साहीत्य,संस्कृती कला अविष्कारालाही प्रोत्साहन दिले जाते.लेखन आणि वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘प्रवरा मंथन’ हे शैक्षणिक नियतकालिक सुरु झाल्याने विद्यार्थ्यामधून साहीत्य क्षेत्रातील उद्याची पिढी निर्माण होईल असा विश्वास असे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.
प्रवरा मंथन या नियतकालीका मधून मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेते विद्यार्थ्याना कथा, कविता, ग्राफीक्स प्रकाशित करता येणार आहेत.
संस्थेतील ४२ विद्यालयाचा यामध्ये सहभाग आहे. पहीला अंक हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वाटचालीवर असून दर वेळीचा अंक हा वेगवेगळी संकल्पना घेऊन प्रकाशित होणार असल्याचे सांगण्यात आले.
विविध करीअरच्या संधीची माहीती अंकात असणार आहे. यांतून नवलेखक, कथाकार, कवी आणि साहीत्यांची नवी ओळख विद्यार्थ्याना करून देण्याचा प्रयत्न आहेच.परंतू यापेक्षाही विद्यार्थी दशेतच वाचन आणि लेखनाची सवय निर्माण होण्यासाठी संस्थेच्या वतीने केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रवरा मंथन या नियतकालीकाची सुरूवात असल्याचे सांगण्यात आले.