spot_img
spot_img

११ वर्षीय मुलावर ९  जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात ११  वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

११  वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी, अहमदनगर  जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. येथील ९  जणांनी मिळून या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केले असून अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अत्याचार प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. ११  वर्षीय वर्षीय अल्पवयीन मुलास धमकावून हा अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला असून पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची गांभीर्यता समोर आली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!