5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

सुरेशनगर( नेवासा फाटा ) ग्रामस्थांना दिलेला शब्द आमदार शंकरराव गडाख यांनी पाळला, पाणीपुरवठा योजनेचे साहित्य गावात दाखलआमदार शंकरराव गडाख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

नेवासा फाटा:(प्रतिनिधी):-नेवासा तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श गाव सुरेशनगर ग्रामस्थांना आमदार शंकरराव गडाख यांनी मागील वर्षी एका कार्यक्रमात सभामंडप व गावाचा समावेश पाणीपुरवठा योजनेमध्ये केला जाईल असा शब्द दिला होता प्रत्यक्ष कृतिशील कार्यातून तो शब्द त्यांनी पाळला असल्याने सुरेशनगर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदार गडाख यांना धन्यवाद देत त्यांचे अभिनंदन केले आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे साहित्य सुरेशनगर येथे दाखल होताच ग्रामस्थांनी एकच जल्लोष करत गडाख साहेब जिंदाबाद अशा घोषणा दिल्या.
    मागील वर्षी सुरेशनगरच्या हनुमान मंदिर प्रांगणात गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज व महंत रमेशानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या मारुती मंदिर जीर्णोद्धार कार्यक्रमात तत्कालीन सरपंच पांडुरंग उभेदळ यांनी मारुती मंदिराला सभामंडप द्यावा तसेच सहा गावे पाणीपुरवठा योजनेत सुरेशनगरचा समावेश करावा अशी मागणी केली होती.
   सुरेशनगर गावाने सरपंच पांडुरंग उभेदळ यांच्या नेतृत्वाखाली आदर्श गाव पुरस्कार दिल्ली येथे घेऊन नेवासा तालुक्याची मान उंचावली होती.ती कामगिरी लक्षात घेऊन या गावातील सभामंडप व पाणीपुरवठा योजनेत समावेश केला जाईल असा शब्द आमदार शंकरराव गडाख यांनी दिला होता. त्यानंतर त्वरित कार्यवाहीचे पहिले पाऊल म्हणून सभामंडप मंजूर करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आता ते काम पूर्णत्वाकडे आहे.तर सहा गावाच्या पाणी योजनेत सुरेशनगरचा समावेश केला.यासाठी लागणारे पाईप भरलेली ट्रक शुक्रवारी दि.७ एप्रिल रोजी सुरेशनगरमध्ये येऊन पोहचली पाणीपुरवठा योजनेत समावेश केल्याने आता सुरेशनगर गावाची तहान कायमची भागणार असे लक्षात घेऊन ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत व “आमदार गडाख तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है”असा घोषणा देत जल्लोष केला.
     ६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा’ योजनेच्या माध्यमातून सुरेशनगर गावाची विशेष निवड व मारुती मंदिर सभामंडप हे या दोन्ही कामांसाठी माजी मंत्री.आमदार शंकरराव गडाख साहेब यांनी विशेष दखल घेऊन कृतीतून कामे सुरू केली व दिलेला शब्द पाळल्यामुळे आम्ही गडाख साहेबांना धन्यवाद गावकऱ्यांच्या वतीने देतो त्यांच्या कृतिशील कामाचे कौतुक करतो अशी भावना व्यक्त करत आमदार गडाख यांचे अभिनंदन केले.आपल्या गावाला तीन महिने उन्हाळयात असणारा पाण्याचा त्रास आता कायमचा मिटणार आहे तसेच पाईपलाईन मटेरिअल देखीलशुक्रवारी गावात आलेले असून लवकरच पाणी पुरवठा योजना काम चालू होणार याबद्दल समाधान व्यक्त केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!