पाथर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील एका शेतकऱ्याने लिंबोडीच्या लावलेल्या बागेच्या आडून गांजाची शेती केली होती. यामध्ये सुमारे सात ते आठ गांजाची झाडी लावली होती.
पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, शिवाजी तांबे, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे या पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस पथकाने अफसरअली भिकनअली सय्यद यांच्या शेतात लावलेले गांजाचे झाड जप्त केले आहे.
माणिकदौंडीपासून बारामतीकडे जाणारा बारामती- औरंगाबाद या राज्य मार्गालगत डाव्या बाजूला रस्त्याच्या पुलानजिक या शेतकऱ्याने लिंबोडी झाडाच्या बागेत आडून गांजाचे झाडे लावून ही शेती सुरू होती. या कारवाईत सुमारे चौदा किलो गांजा हस्तगत झाला आहे.
याप्रकरणी अफसरअली भिकनअली सय्यद (वय ६० रा. माणिकदौंडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बेकायदेशीररित्या सय्यद हा राजरोजपणे शेतात गांजाची शेती करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्य व्यक्त होत आहे.
पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन दराडे, सुहास गायकवाड, विजय काळोखे, विनोद मासळकर, ईश्वर बेरड, भगवान टकले, प्रशांत केदार, सोमा घुगे या पोलीस कर्मचाऱ्यांचा या कारवाईत समावेश होता.
याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे करीत आहे.