9.9 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

संदीप कोतकर यांची माघार…

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ):- विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासून अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघात राजकीय धुराळा उठण्यास सुरवात केलेली आहे. हा धुराळा गणेशोत्सव मिरवणुकीनंतर मोठ्या प्रमाणात उडाला आहे. या मिरवणुकीत सहभागी होऊन माजी महापौर संदीप कोतकर यांनी आपण अहिल्यानगरमध्ये राजकीय प्रवेश करत असल्याचे संकेत दिलेले आहे.माजी महापौर संदीप भानुदास कोतकर यांना घातलेली जिल्हा बंदीची अट शिथील केली.

कोतकर समर्थकांनी एकच जल्लोष केला. काही ठिकाणी फटाके वाजविण्यात आले.  कोतकर समर्थकांमध्ये दिसून येत होता. यामुळे कोतकर समर्थकांमध्ये उत्साह वाढलेला आहे.. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १८) हा निर्णय दिला आहे.संदीप कोतकर यांची जिल्हा बंदी उठल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी नगर शहरासह केडगाव उपनगरात फटाके फोडून जल्लोष केला.

विधानसभा निवडणूक जाहीर होण्या आधीपासून नगर शहरात माजी महापौर संदीप कोतकर हे निवडणूक लढविणार किंवा कसे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या.

संदीप कोतकर यांना जिल्हा बंदी करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने कोतकर  यांची जिल्हा बंदी २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०२४ या कालावधीसाठीच उठवलेली आहे. त्यांना ४२ दिवसच जिल्ह्यात राहाता येणार आहे.ही बंदी उठल्यामुळे कोतकर यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे. परंतु त्यांना आता राजकीय विरोध होत आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेशलाही अहिल्यानगर जिल्ह्यातून विरोध होत आहे. शरद पवार गटातही एका लोकप्रतिनिधीचा विरोध आहे. कोतकर यांना उमेदवारी देऊ नका म्हणून त्यांनी मुंबईत ठाम मांडलेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोतकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, अशा वावड्या उठत आहेत. प्रत्यक्षात तसा कोणताच निर्णय कोतकर यांनी घेतलेला नाही. तसेच जाहीर केलेले नाही. विरोधकांनी तशा वावड्या उठविण्यास सुरवात केलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही वावड्यांवर भरोसा ठेऊ नये. काही झाले तरी या वेळी कोतकर कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढविणार आहे, त्यामुळे सर्वांनी एकजूट राहून कोतकर यांना विधानसभेत पाठवायचे हा निश्चय पक्का करावा, असे आवाहन केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!