12 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

आपले शहर भविष्यकाळात मेट्रोसिटीकडे वाटचाल करील – आ. संग्राम जगताप नगर शहरातील सथ्था कॉलनीतील नागरिकांची आ. संग्राम जगताप यांनी साधला संवाद

नगर( जनता आवाज वृत्तसेवा) :- आपल्या शहराला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा लाभलेला असून पूर्वी विकास कामांपासून वंचित होते मात्र गेल्या १० वर्षात मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावली आहे, खड्डे मुक्त शहराची संकल्पना राबवून नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची रस्ता कॉंक्रीटकरण्याची कामे सुरू आहे.

उड्डाणपुलाखालील देखील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम मार्गी लागावे यासाठी निधी उपलब्ध करून देत शिल्पा गार्डन ते मार्केट यार्ड चौकापर्यंतचे काम सुरू होणार आहे, आपल्या शहराच्या प्रगतीसाठी काम करायचे आहे, शहराला चांगली बाजारपेठ लाभलीअसून याचबरोबर दिशा देणारा प्रकल्प म्हणजे एमआयडीसी होय यासाठी विळद घाट येथे ६०० एकर जागा औद्योगीकरणासाठी आरक्षित करण्यात आली असल्यामुळे या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प आणण्यासाठी काम सुरू आहे,  सर्वांच्या सहकार्यातून चांगले काम उभे राहत असून आता योग्य दिशा मिळाल्या असून आपले शहर भविष्यकाळात मेट्रोसिटीकडे वाटचाल करील असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले

नगर शहरातील सथ्था कॉलनीतील नागरिकांशी आमदार संग्राम जगताप यांनी संवाद साधला, यावेळी उद्योजक राजेंद्र चोपडा, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, अण्णासाहेब मुनोत,अरविंद गुंदेचा, संदीप गांधी, आदेश चंगेडिया, शरद मुनोत, सुधीर चोपडा, नरेंद्र लोढा, राजेंद्र बलदोटा, विजय गुगळे, दिलीप गुंदेचा, किरण शिंगवी, अतुल मुनोत, प्रकाश गांधी, राजेंद्र गांधी आदीसह व्यापारी बांधव मोठे संख्येने उपस्थित होते,

उद्योजक राजेंद्र चोपडा म्हणाले की, शहराला सुसंस्कृत आणि प्रामाणिक नेतृत्व मिळाले असून सर्वांना बरोबर घेऊन शहर विकासाचे काम करत आहे आमदार संग्राम जगताप यांनी राबविलेल्या विकास कामाची दखल नगरकर नक्कीच घेतील कारण कधीही न झालेली विकासाची कामे पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहे, जैन समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात आणि मार्गी देखील लावतात धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन संत महंतांच्या विचारांची प्रेरणा घेत असतात असे ते म्हणाले.

ॲड. प्रमोद मेहेर म्हणाले की सध्या राजकारणाचा बट्ट्याबोळ झाला असून एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप केले जाते मात्र आपल्या शहराचे लोकप्रतिनिधी विकास कामांचे व्हिजन ठेवून काम करत आहे त्यांच्या कुटुंबाला मिळालेला वारसा पुढे घेऊन जात आहे आपल्या शहराबद्दल असलेली आत्मियता पाहून असे वाटते की, शहराचा भविष्यकाळ उज्वल आहे असे ते म्हणाले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!