spot_img
spot_img

हिंदुत्वासाठी विधानसभा लढविणार! पत्रकार परिषदेत श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग यांचा एल्गार

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- सध्या हिंदुत्वाच्या मुद्यावर कुणीही बोलायला तयार नसल्याने आज हिंदूंसाठी लढा देण्यासाठी आपण विधानसभा उमेदवारी पक्षाने देऊ किंवा नाही देऊ, आपण अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग यांनी पत्रकार परिषदेत सागितले.

महाराष्ट्रासह श्रीरामपुर राखीव विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत वाल्मिकी समाजाला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही. मात्र आपण जात कुठलीही मानत नाही. आज हिंदू समाजासाठी लढा उभारला आहे. जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यात लव्ह जिहादसारखे प्रश्न उद्भवत आहेत. त्यात अनेक लव्ह जिहादचे प्रकरणे उघडकीस आणले आहे. त्यासाठी आंदोलन मोर्चाचे हत्यारही उपासले असून आजही लव्ह जिहाद प्रकरणी न्याय मागत आहोत.

हिंदूंचे अनेक प्रश्न आहेत. या मुद्द्यावर आजपर्यंत कुठलाही राजकीय व्यक्ती बोलायला तयार नाही. आज समाजाला एकत्रित करण्यासाठीच आपण उमेदवारी करणार आहे. राष्ट्रीय श्रीराम संघाने तीन वर्षात हिंदुत्ववादीच्या विविध मुद्द्यावर जवळपास ७० आंदोलने केली आहे.

श्रीरामपूरसह इतर तालुक्यात श्रीराम संघाच्या ३० शाखा स्थापन आहेत. मला उमेदवारीसाठी कोल्हापूर येथील राजेंचे वंशज संभाजी राजे व संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या निकटवर्तीयांनी संपर्क साधला आहे. याचबरोबर शिवसेना शिंदे गट यांची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना संपर्क केला आहे. जरी आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही, तरीही आपण हिंदूंसाठी अपक्ष उमेदवारी करणार आहे.

माझ्या या निवडणुकीसाठी सर्व स्तरातील हिंदुत्वादी, याचबरोबर साधुसंताचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, माझ्या प्रचारासाठी नामांकित साधुसंतही प्रचाराला येणार असल्याचे बेग यांनी सांगितले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!