शेवगाव दि.7( प्रतिनिधी):-शासन निर्णयानुसार दिव्यांगांना हक्काचा निधी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला दिव्यांगासाठी ग्रामपंचायतच्या निव्वळ उत्पन्नाच्या पाच टक्के निधीतून निधीच्या माध्यमातून खर्च करणे बंधनकारक आहे ,
आणि यात कुठली कुचराई केल्यास त्या ग्रामपंचायत वर कारवाई करण्यात येईल त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशा प्रकारचे सर्व ग्रामपंचायत ला सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गाट यांनी पत्र देऊन इशाराही दिला आहे ,
दिव्यांग प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या महिला जिल्हाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मी देशमुख यांनी अहमदनगर जिल्हा सह शेवगाव तालुक्यातील दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी शेवगाव पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गाट यांना लेखी निवेदन दिली असून निवेदनात त्यांनी म्हटले आहे की , शासन निर्णयानुसार दिव्यांगांना हक्काचा निधी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला दिव्यांगासाठी ग्रामपंचायतच्या निव्वळ उत्पन्नाच्या पाच टक्के निधीतून निधीच्या माध्यमातून खर्च करणे बंधनकारक असताना देखील खर्च होत नसल्याचे निदर्शनात आल्याने आणि दुर्दैव म्हणजे सगळ्यात दुर्बल घटक असलेल्या दिव्यांग बांधव यांच्यासाठी शासन निर्णयानुसार मिळत असलेला हक्काचा निधीदेखील ग्रामपंचायत पासून पंचायत समिती पर्यंत दिव्यांग बांधवांची जाणून-बुजून अधिकारी वर्ग हेळसांड करतात ,त्यांच्यावर होत असलेला अन्याय आम्ही कदापिही सहन करणार नसून हृदय सम्राट बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिव्यांग बांधव लढत आहोत , ग्रामपंचायतचे अधिकारी दिव्यांगाचा निधी देण्यास टाळाटाळ करतात, निधीचा गैरवापर केला जातो, शासन निर्णयानुसार प्रत्येक गावातील दिव्यांगांचा सर्वे करून शासनाने त्यांची दखल घेऊन प्रथम प्राधान्यांनी त्यांना घरकुल ही देण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन देऊन देखील आमचा विचार न केल्यास हृदय सम्राट बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मी देशमुख , अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेंडगे ,उपाध्यक्ष लक्ष्मण अभंग प्रहार दिव्यांग संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष लहूराव भवर, प्रहारच्या महिला तालुकाध्यक्ष पुष्पाताई वाघमारे, संदीप गालफाडे यांनी दिला आहे ,
पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गाठ यांनी प्रहार दिव्यांग संघटनेचे निवेदन स्वीकारून शेवगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत तिने दिव्यांगासाठीचा पाठ टक्के निधी खर्च करणे बंधनकारक असून सन 2022/ 23 अखेर दिव्यांगासाठीचा केलेला खर्च खालील नमुन्यात तात्काळ सादर करण्यात यावा, खर्च न केल्यास संबंधितांवर नियमानुसार पुढील उचित कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्याचे पत्र प्रत्येक ग्रामपंचायतला काढल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले ,
पंचायत समिती ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबवा. अन्यथा प्रहारच्या दिव्यांग स्टाईलने महिला जिल्हाध्यक्ष राज्य कार्यकारणी सदस्य लक्ष्मी देशमुख यांचा सजड इशारा