spot_img
spot_img

पुन्हा लंके अन् विखे यांच्यात लढत.. कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण.. पारनेरमध्ये एक मत होत नसल्याने कार्यकर्त्यांनीच मार्ग शोधला…

पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा ):-पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी नेमकी कोणाला याचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे या मतदारसंघातून माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी करावी, अशी अपेक्षा आता कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

पारनेर-नगर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या गटाला मिळालेली आहे. या गटात सध्या इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. या गर्दीमुळे सध्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

महायुतीकडून नेमका कोण उमेदवार आहे, याबाबत कार्यकर्ते एकमेकांना विचारत आहे. विरोधी गटाच्या उमेदवाराने प्रचार सुरु केलेला आहे. मात्र महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात प्रचाराला कमी वेळ मिळणार आहे, असे कार्यकर्त्यामधून बोलले जात आहे.

महायुतीत सध्या उमेदवारीचा सुरु असलेला घोळ त्वरित मिटवावा, अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादी गटात जर एकमत होत नसेल तर ही जागा भाजपला देऊन येथे माजी खा. सुजय विखे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकसभा निव़डणुकीनंतर पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये लंके विरुध्द विखे अशी लढत होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेची लढत लंके यांनी जिंकली आहे. आता विधानसभेची लढत कोण जिंकणार यावर सध्या चर्चा सुरु आहे. महायुतीतील सर्वच पक्षातील उमेदवारांनी एकत्र येऊन विखे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरली जात आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!