लोणी दि.७ (प्रतिनिधी):-प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा टेक एक्सपो २०२३ चे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून २२५ प्रकल्पांनी सहभाग घेतला अशी माहीती प्रवरा अभियांञिकीचे प्राचार्य डॉ.एस.एम.गुल्हाणे यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी मायक्रोसॉफ्ट, मुंबईचे वरिष्ठ उद्योग कार्यकारी अधिकारी आणि इन्स्ट्रुमेंटेशन आणि नियंत्रण विभागाचे माजी विद्यार्थी महेंद्र हसबनीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी श्री हसबनीस यांनी अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रातील तांत्रिक बदलांची माहिती दिली. त्यांनी असेही नमूद केले की आता चॅट जीपीटी तंत्रज्ञान अस्तित्वात आले आहे, त्यामुळे तुमच्या समोर अनेक संधी आणि आव्हाने आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील तंत्रज्ञान व्यवस्थापन उदयोन्मुख आव्हानेही त्यांनी विशद केली.
सी. आय. आय. ए. मुंबईचे मुख्य मिशन प्रवर्तक श्री. कृष्णकुमार रंगनाथन सांगितले की नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी अनेक स्टार्टअप संधी उपलब्ध आहेत. त्यांनी स्टार्टअप प्रकल्पांच्या संधी विस्तृतपणे सांगितल्या.
या स्पर्धेत अभियांत्रिकी प्रवर्गातून डॉ. वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या “स्मार्ट लर्निंग डिव्हाइस” प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळाले. गुरू गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च सेंटर नाशिकच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या “चीट डिटेक्शन सिस्टम युजिंग एम्बेडेड क्यूआर कोड आणि स्पीच रेकग्निशन” या प्रकल्पाला द्वितीय पारितोषिक मिळाले. आणि, तिसरे पारितोषिक “डिझाइन ऑफ मल्टी-ऑपरेशनल मशीन ”
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे.पॉलिटेक्निक श्रेणीतून, शासकीय पॉलिटेक्निक अहमदनगरने विकसित केलेल्या “अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टिम” या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळाले.
संजीवनी के.बी. पी. पॉलिटेक्निक कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या सी,एन,एन. आधारित फेस रिकग्निशन” या प्रकल्पाला द्वितीय पारितोषिक मिळाले.
आणि तिसरे पारितोषिक जिंकले अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, संगमनेरच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेला “फॉरेस्टेशन डिटेक्शन सिस्टम” प्रकल्पाने.
या प्रसंगी संजीवनी के बी पी पॉलिटेक्निकला “टेक एक्सपो-२०२३ मध्ये सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा सहभाग” हा पुरस्कार मिळाला.
अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक व विभागप्रमुख डॉ.चंद्रकांत कडू यांनी दिली. डॉ. कडू यांनी नमूद केले की, आम्हाला देशातील विविध राज्यांमधून विविध अभियांत्रिकी शाखेतील प्रकल्प प्राप्त झाले आहेत या प्रसंगी सहसचिव भारत घोगरे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एस.एन.हिरेमठ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक श्री एन एन लोखंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक डॉ.सी.बी.कडू, समन्वयक एन.एन.लोखंडे यांनी परिश्रम घेतले.