11.9 C
New York
Thursday, October 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रवरा स्पर्धा परिक्षा केंद्राचे घवघवीत यश १२ विद्यार्थ्याची शासकीय सेवेत निवड

 
लोणी दि.६ (प्रतिनिधी):-लोकनेते पद्मभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यामातून संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रवरा स्पर्धा मार्गदर्शन केंद्रातील १२ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड झाली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शहरात जावे लागते.शहरात यासाठी लागणारा खर्चही परवाडणारा नसतो.त्यामुळे स्थानिक पातळीवर ही व्यवस्था मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतू संस्थेने सुरू केली.यासाठी प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली असून या केंद्राव्दारे महाराष्ट लोकसेवा आयोग, पोलिस आणि आर्मी,तलाठी, जिल्हा परिषद भरती आदी परिक्षेबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तज्ञाकडून मार्गदर्शन होत आहे. 
विविध स्पर्धा परीक्षांसाठी असेलेल्या संधी तसेच यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, पुस्तके याबाबतही मार्गदर्शन देण्याचा केंद्राचा मुख्य हेतू आहे . 
स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत उमेदवारांना अभ्यासिका,ग्रंथालय सुविधा प्रदान करण्यात येतात .पुणे, नाशिक अहमदनगर या ठिकाणच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नामवंत अध्यापक वर्ग आणि अधिकारी यांचे विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त करून दिले जाते .स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नियमित सराव चाचणी घेतली जाते . स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत शिर्डी,राहाता,लोणी ,पाथरे, आणि आश्वी या ठिकाणी अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत,आजपर्यंत १००२ पेक्षा जास्त विद्यर्थ्यांनी स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेश घेतला आहे . 
 २०२०-२१ या वर्षात किसन एकनाथ सरोदे (प्रोबेशनरी ऑफिसर स्केल १) ,सागर बबन शेरमाळे (नाशिक सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस) प्रदीप जगन्नाथ देठे (महाराष्ट्र लोक सेवा आयोग कर सहायक) ,दिपक भानुदास पर्वत (आर्मी सर्विस कोर), किशोर सोपान मुर्तडक (महाराष्ट्र लोक सेवा आयोग क्लार्क ) सौरभ वाणी (टेट परीक्षा ),स्वप्नाली शिंदे (आसाम राईफल्स), वाढवणे संजय दत्तू(इंडियन आर्मी), कृष्णा जपे (इंडियन आर्मी ) ,आशिष कदम (इंडियन आर्मी),आकाश तांबे (इंडियन आर्मी), कल्पेश जाधव (इंडियन आर्मी) या उमेदवारांची निवड झाली आहे .
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने नेहमीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून वेगळेपण जपले आहे. या प्रयत्नामुळेच केंद्रातील १२ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत झालेली निवड ही प्रवरा परीवाराच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. या केंद्रासाठी वेळोवेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,खा. डॉ. सुजय विखे पाटील तसेच इतर संचालक मंडळ याचे मार्गदर्शन प्राप्त होत असते.तसेच संस्थेचे सह सचिव भारत घोगरे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ प्रदीप दिघे , संचालिका सौ.लिलावती सरोदे,सह समन्वयक डाॅ.राम पवार यांचेमार्फत विविध बाबतीत मोलाचे सहकार्य प्राप्त होत आहे.
प्रवरेत दर्जदार शिक्षण मिळाले.शासकिय सेवेत नोकरी हे स्वप्न होते.प्रवरेच्या स्पर्धा परिक्षा केंद्रात प्रवेश घेतल्या नतंर विविध स्पर्धा,निवड प्रक्रिया, विविध व्याख्याने,मुलाखत तंञ आदीची उत्तम माहीती मिळाल्याने यश संपादन करता आले.हा आनंद मोठा आहे
           – किसन सरोदे विद्यार्थी
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!