संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- लोकसभा निवडणुकीपासून विखे व थोरात यांच्यात सध्या शाब्दीक युध्दी सुरु झालेले आहे. हे युध्द आता चांगलेच पेटलेले आहे.
सध्या माजी खासदार डाॅ. सुजय विखे हे संगमनेरमध्ये सभा घेत आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील वातावरण चांगलेच तापलेले आहेत. त्यातच आज सुजय विखे यांच्या समोरच भाजप कार्यकर्त्याने डाॅ. जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या टीकेमुळे तालुक्यातील वातावरण तणापूर्ण झालेले आहे. काही ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे.
संगमनेरमधील अकोले नाका परिसरात वाहनाची जाळपोळ करण्यात आलेली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या अग्नीशामक पथकाने आग अटोक्यात आणली आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार डाॅ. सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या युवा संकल्प मेळाव्यात विखे समर्थक असलेले वसंतराव देशमुख यांनी काॅंग्रेसचे नेते तथा आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्या डाॅ. जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे संगमनेरमध्ये वाहनांची तोडफोड झालेली आहे.



