शिर्डी,दि.६ (प्रतिनिधी):- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन शिर्डी येथे करण्यात आले.


असल्याची माहिती भाजपाचे शहर अध्यक्ष सचिन शिंदे यांनी दिली.
शुक्रवार दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४ वा. या गौरव यात्रेची सुरुवात स्वामी रिसोट पासुन सुरु होणार असून, शिर्डीतील प्रमुख रस्त्यांवरुन मार्गस्थ झाल्यानंतर छत्रपती व्यापारी संकुलाच्या प्रांगणात या यात्रेचा समारोप होणार आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यासह प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या गौरव यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास दर्शविणारा गौरव रथ तयार करण्यात आला असून, कार्यकर्ते या यात्रेत सावरकरांच्या संदेशाचे फलक घेवून सहभागी होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या गौरव यात्रेत भाजपाच्या सर्व आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सावरकरांच्या संदर्भात सातत्याने कॉंग्रेस नेत्यांकडून केल्या जात असलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून संपुर्ण राज्यात भाजपाच्या वतीने गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले असून, उत्तर नगर जिल्ह्यातही मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गौरव यात्रा संपन्न होणार असल्याचे शिंदे म्हणाले.