लोणी,दि.६ प्रतिनिधी :-देशहित आणि जनहिताचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार घेत आहे. त्यांच्या दुरदृष्टीमुळेच भारत देशाचा गौरव आज विश्वात होत आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वांमुळे भारत देशाचा जगात गौरव-माजी मंत्री म्हस्के पाटील.
सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक सक्रीय होण्याची अपेक्षा जेष्ठ नेते व माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात म्हस्के पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या उपस्थितीत ध्वज फडकावून अभिवादन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पध्दतीने देशातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधलेला संवादही स्क्रीनवर सर्वांनी सामुहिकपणे पाहीला. स्थापना दिवसापासून पक्षाच्या वतीने सामाजिक न्याय सप्ताहाचे आयोजनही करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आनंदाच्या शिध्याचे वितरण लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सरंपच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, किसनराव विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, अशोक धावणे, राहुल धावणे, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष सतिष बावके, राहुल घोगरे, देविदास म्हस्के, गणेश विखे, दिलीप विखे, भाऊसाहेब धावणे, आंबादास कडगल, पंकज कडलग, मयुर मैड यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाड्यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती ज्या वेगाने झाली आहे, त्याचे लाभ सर्वच क्षेत्रांना होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागाचा विकास साध्य करताना समाजातील शेवटच्या घटका पर्यंत हा विकास पोहोचविण्याचे काम सुरु आहे. या योजनांच्या रुपाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सघटनात्मक कार्याला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संघटनेची ताकद ही वाढत असते. सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा पक्षाच्या उपक्रमाचा एक भाग बनला आहे. यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अधिक योगदान देण्याची गरज आहे असे त्यांनी स्पष्टकेले.




