सुरुवातीस स्वामीजींची आरती झाली. त्यानंतर रथाचे ज्येष्ठ सेवेकरी बनसोडे काका यांचे मार्गदर्शनझाले. त्यानंतर नैवेद्य आरती व गाणगापूर च्या दत्तांच्या दिव्य पादुकाचे पूजन झाले. धान्य पूजन व नैवेद्य आरती झाली.प्रत्येक जिल्ह्यातील खेडे गावामध्ये सुरू असलेले श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र येथे जाऊन ‘संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल ‘ हा माऊलीचा संदेश घेऊन समाजामध्ये विवाह संस्था, बाल संस्कार, युवा प्रबोधन आरोग्य, शेतीशास्त्र, वास्तुशास्त्र, आहार, शिक्षण, प्रशिक्षण दिले जाते.
नेवासा फाटा येथे श्री स्वामी समर्थाच्या दिव्यपादुका रथाचे भव्य स्वागत.
नेवासा फाटा( प्रतिनिधी) :-दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राचे प. पु गुरुमाऊली यांचे प्रेरणेने आदरणीय चंद्रकांत दादा यांचे आशीर्वादाने पादुका रथाचे भ्रमण राज्यभर सुरू असून त्याचे आगमन नेवासा फाटा येथील पाट बंधारे वसातीतील भव्य अशा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रा मध्ये झाले. यावेळी सेवेकर्यांनी उस्फुर्त स्वागत केले.
सेवा केंद्रामध्ये सर्व याग – यज्ञ केले जातात देशावरील संकट टळावे, जलप्रलय, पृथ्वीवर होणाऱ्या अघटीत घटना, कोरोनासारखी महामारी यापासून होणारे आघात टाळण्याकरिता नवचंडी पासून ते अब्ज चंडी पर्यंत सेवा सर्वच केंद्रावर, गुरु पिठावर सुरू असून सेवे करांच्याद्वारे त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा. असा संदेश गुरुमाऊली द्वारे मिळत आहे. हा माऊलींचा पादुका रथ सन 2005 पासून सेवेकऱ्यांना दर्शन व प्रबोधन देत आहे.
सायंकाळी श्रीआरती नंतर पादुका रथाचे प्रवरासंगमकडे प्रस्थान झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक, सेवेकरी महिला उपस्थित होत्या.




