कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कृषी विस्तार आणि शेतकरी विकास या श्रेणी अंतर्गत 16 व्या राष्ट्रीय स्तरावरील महा ॲग्रो आयडॉल पुरस्कार-2024 साठी नामांकन कृषक शेतकरी गटाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे कृषक शेतकरी गटातील सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथील कृषक शेतकरी गटाचे कार्य उल्लेखनीय आहे. ॲग्रोकेअर कृषी मंच ही गेल्या १५ वर्षांपासून शेती आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारी संस्था आहे. दरवर्षी ही संस्था कृषी शिक्षण, कृषी विस्तार, कृषी संशोधन, कृषी उद्योजकता या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करते.
यावर्षीही महाराष्ट्रातील विविध मान्यवरांचा व गटाचा गौरव करत आहे. कृषक गटांतर्गत शेतकरी उद्योजक बनवणे. तसेच आर्थिक प्रगती वाढवून कृषी पूरक व्यवसाय समृद्ध करणे आदी विकसनशील कार्यासाठी कार्यरत असते. म्हणून यावर्षी दिला जाणारा कृषी विस्तार आणि शेतकरी विकास या श्रेणी अंतर्गत 16 व्या राष्ट्रीय स्तरावरील महा ॲग्रो आयडॉल पुरस्कार 2024 साठी नामांकन कृषक शेतकरी गटाची निवड करण्यात आले आहे.
हा पुरस्कार सोहळा दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे आयोजित केला आहे.