5.8 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

सिव्हिल हडको परिसरातील विकासाची कामे आ. संग्राम जगताप यांनी मार्गी लावली – सतीश बारस्कर

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- सिव्हिल हडको परिसरातील विकासाची कामे मार्गी लागावीत यासाठी आ. संग्राम जगताप यांनी शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्यामुळे अंतर्गत रस्ता कॉंक्रिटी करण्याची कामे सुरू आहेत गणेश चौक ते मिस्कीन मळा रोड हा अत्यंत खराब झाला होता. त्याचे काम सुरू असून लवकरच नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांकडून ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. माता भगिनी औक्षण करून आशीर्वाद देत आहेत. सिव्हिल हडको परिसरातील नागरिक विकास कामांच्या पाठीमागे उभे राहून आमदार संग्राम जगताप यांना मतरूपी आशीर्वाद देणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी सिव्हिल हडको गणेश चौक परिसरातील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक सतीश बारस्कर यांनी केले.

नगर शहर विधानसभा निवडणूक महायुती चे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सिव्हिल हडको येथे विकास यात्रेच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी नागरिकांची संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक सतीश बारस्कर, गजेंद्र भांडवलकर,शिवाजी डोके,काका शेळके,आनंद लहामगे,दिलीप कटारिया, विशाल म्हस्के,रोहन धिप्पाड,अजय रंगलाणी,किरण पिसोरे,अरुण खरात,प्रमोद पगारे,अनिरुद्ध भोर,सचिन जगताप,संकेत पुजारी,जय दिघे,यश कांडेकर,किरण बारस्कर,नमन महांकले,प्रशांत पगारे,शुभम भोसले,विजय काकडे,पराग महांकाळ,अजय भोसले,अभि भांडवलकर,विजय ठोंबरे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. संग्राम जगताप यांनी शहर विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी मंजूर करून आणला आणि शहरातील विविध भागातील विकासाची कामे सुरू केली. त्या माध्यमातून शहराचा कायापालट होताना दिसत आहे. आता विधानसभेची निवडणूक सुरू झाली असून, प्रचारानिमित्त वार्डा-वार्डात फिरत असताना नागरिकांकडून मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यात येते. ते पाहून मन भारावून जात आहे. आणि केलेल्या कामाचे स्वागत नागरिक करत असल्याचे मत. जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी व्यक्त केले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!