कोल्हार ( वार्ताहर ) :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल बुधवार दि. ५ एप्रिल २०२३ रोजी गव्हाची १३९ क्विंटल आवक झाली. गहू कमीत कमी २००० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त २२४६ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला. गहू सरासरी २१५० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला.
तसेच कोल्हार उपबजारात सोयाबीनची १० क्विंटल आवक झाली. सोयाबीन कमीत कमी ४७०१ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त ५२४१ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली. सोयाबीन सरासरी ५२०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली. हरभऱ्याची १४ क्विंटल आवक झाली. हरभरा कमीत कमी ४६०० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त ४८८१ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला. हरभरा सरासरी ४८०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.





