7.2 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

एकीकडे लाडकी बहीण योजना तर दुसरीकडे त्यांच्यावरच अन्याय -आ. प्राजक्त तनपुरे  तालुक्यात गाव भेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद 

अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा) :- राज्य सरकारने एकीकडे लाडकी बहीण योजना अमलात आणली असून दुसरीकडे त्याच बहिणींवर अन्याय करण्याचे उद्योग तालुक्यात सुरू असल्याची टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री मोकाटे यांच्यावर अन्याय करणारे कोण ? असे अनेकांचे संसार उध्वस्त करण्याचे काम विरोधकांनी केले असल्याचेही तनपुरे यांनी सांगितले.

आ. तनपुरे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू असून खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी, मांजरसुंभा, डोंगरगण, चापेवाडी, इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी, पिंपळगाव उज्जैनी, शेंडी, पोखर्डी, धनगरवाडी या गावांनी तनपुरे यांनी गाव भेटी दिल्या. गाव भेटीदरम्यान तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जन आशीर्वाद यात्रेस दिसून आला. चापेवाडी येथे बोलताना आमदार तनपुरे यांनी सरकारवर चांगलीच टीका केली.

तनपुरे यांनी सांगितले की, आमच्या सरकारच्या काळात शेतकरी हितासाठी सुरू केलेल्या योजना नवीन सरकारने बंद केल्या. योजनेमध्ये दोन हजार कोटी रुपये शिल्लक असताना योजना बंद केली गेली अन्यथा अनेक सब स्टेशन, रोहीत्र बसवून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असते. पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येणार असून सर्व शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील.

शेतमालाला भाव, दुधाला भाव, गावातील अंतर्गत रस्ते, शेतकऱ्यांना दिवसा वीज हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन ही योजना नवीन सरकारने बंद केल्यामुळे नगर तालुक्यातील अनेक गावे रस्त्यांपासून वंचित राहिली. आमदार तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी असतो सत्तेचा गैरवापर, दहशत करण्यासाठी नसतो. त्यामुळे सत्तेचा गैरवापर दहशत, दमदाटी करणाऱ्यांना घरी बसवा असे आवाहन तनपुरे यांनी केले.

याप्रसंगी गोविंद मोकाटे, रघुनाथ झिने, सिताराम काकडे, रामेश्वर निमसे, अमोल जाधव, विलास काळे, आदेश भगत, दत्तात्रय डोकडे, अंबादास पवार, बाबासाहेब भिटे, भैय्या पवार, सागर गुंड यांच्यासह तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!