5.8 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयासाठी पाठपुरावा करणार – आ. कानडे राष्ट्रवादी काँग्रेस व श्रीरामपूर विधानसभेच्या घोषणापत्राचे प्रकाशन

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – अहमदनगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. या जिल्ह्याचे विभाजन व्हावे, यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणारा मी पहिला आमदार आहे. श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे मुख्यालय असावे, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच श्रीरामपूर विधानसभेच्या घोषणापत्राचे प्रकाशन ऑडिओ-व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले. याचवेळी काँग्रेस भवन येथे श्रीरामपूर विधानसभा घोषणा पत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत आ. कानडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, आदिवासी भिल्ल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, सरपंच सागर मुठे, विश्वनाथ आवटी, मल्लू शिंदे, पी. एस. निकम, उत्तमराव पवार, भागचंद औताडे, महिला तालुकाध्यक्ष मंदा गवारे, प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे हे आपले स्वप्न आहे. भौगोलिक दृष्ट्या जिल्हा विस्तीर्ण असल्याने विभाजन अटळ आहे. त्यामुळे विधिमंडळात श्रीरामपूर जिल्हा व्हावा, अशी मागणी करणारा मी पहिला आमदार आहे. याशिवाय शहरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे व्हावेत, अशी आपली मागणी आहे. प्रशासकीय कामाचा अनुभव असल्याने त्याचा उपयोग मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी केला. यापूर्वी केवळ उद्घाटन होत होती. परंतु आपण कार्यारंभ आदेश आल्याशिवाय तसेच विकास कामांचे फलक लावल्याशिवाय उद्घाटने केली नाही. स्व. आदिकांनी तालुक्याला विकासाचे पर्व सुरू करण्याचा वारसा दिला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मतदार संघातील मायबाप जनतेने माझ्यासारख्या गरिबाच्या मुलाला विधानसभेत पाठविले. त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता मतदार संघात बाराशे ते तेराशे कोटी रुपयांची विकास कामे केली. या कामांमध्ये पारदर्शकता हवी हे धोरण ठेवले. विकास कामांमुळे सर्व सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर होतो. परंतु काहींनी कटकारस्थान करून आपली उमेदवारी कापली. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली. पुढील काळात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे ध्येय घेऊन वाटचाल करणार असल्याचे आ. कानडे यावेळी म्हणाले.

अविनाश आदीक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा राज्यात एकाच वेळी प्रसिद्ध केला. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला असून जाहीरनाम्यातील सर्व कामे पूर्ण होतील. आ. कानडे यांच्या रूपाने चांगला आमदार मिळणार आहे. त्यांना पुन्हा संधी दिली जाणे हे आपले भाग्य राहील. त्यामुळे निवडणुकीत त्यांना मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अशोक कारखान्याचे माजी संचालक प्रा. कार्लस साठे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, सतीश बोर्डे, वळदगावचे सरपंच अशोक भोसले, सचिन जगताप, राजेंद्र कोकणे, विष्णुपंत खंडागळे, विजय शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रईस जागीरदार, शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, तालुका युवक उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव फारुख पटेल, हंसराज आदिक, सुनील थोरात, आदित्य अदिक, बाळासाहेब उंडे, संदीप चोरगे, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले, अक्षय नाईक, बाबासाहेब कोळसे, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, आबा पवार, मदन हाडके, रमेश आव्हाड, अमोल आदीक, ज्ञानदेव आदीक, दीपक कदम, अजिंक्य उंडे, इमरान शेख, भैय्या शहा, सागर कुऱ्हाडे, बाबासाहेब ढोकचौळे, अण्णासाहेब गवारे, सुदाम पटारे, प्रताप पटारे रवींद्र मुरकुटे, रवी अण्णा गायकवाड, सचिन ब्राह्मणे, संदीप दांगट, तुकाराम चींधें, राधाकृष्ण तांबे, डॉ. सर्जेराव सोळुंके, अनिल बिडे, नानासाहेब बडाख, विष्णुपंत बडाख, विजय दवंगे, जमीर पिंजारी, कदिर पटेल, हरिश्चंद्र साळुंके, रवी राजुळे, सचिन कोळसे, प्रकाश चौधरी, दत्तात्रय जाधव, जुगल गोसावी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!