3.8 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

नेवाशात २०१४ ची पुनरावृत्ती होणार …

नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा विधानसभा निवडणूक तिरंगी होत आहे. या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून चांगलीच चुरस निर्माण झालेली आहे. या निवडणुकीत 2014 सालातील विधानसभा निवडणुकीची पुर्नरावृत्ती होणार असल्याची चर्चा  सध्या तालुक्यात सुरु आहे.

नेवासा विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दुरंगी लढत व्हावी, यासाठी सर्वांनीच प्रयत्न केला. परंतु माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उमेदवारी अर्ज राहिल्याने महायुतीची सर्व समीकरणे बिघडली असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात महाविकास आघाडीची सर्व समीकरणे बिघडलेली आहेत. मुरकुटे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनीआपण एकहाती निवडणूक जिंकणार असल्याचे दावे करण्यास सुरवात केलेली आहे. कमीत कमी एक लाखाचे विजयाचे लिड राहिल, असे दावे काही कार्यकर्ते करीत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु झालेली आहे.

त्यामुळे प्रचारात सक्रीय असलेली यंत्रणा आता सुत्य झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारचे दावे केले जात होते. तेव्हाही एक लाखाच्या लिडने विजय होईल, असे कार्यकर्ते व पीए सांग होते. परंतु त्यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणला होता.

आता तसाच विजय मुरकुटे मिळवतील, अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. आमदार शंकरराव गडाख यांची यंत्रणा सध्या ढेपाळलेली दिसून येत आहे. मात्र त्या उलट सध्या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची यंत्रणा तालुक्यात सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांनी आता प्रत्येक गटात जाणून प्रचार सुरु करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!