श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. म्हणूननच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने काम करणारे नेतृत्व ओळखावे, असे आवाहन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नायकवाडी यांनी केले.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ यशोधन कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सचिव हसीन शेख. प्रसिद्धीप्रमुख ताहीर बेगम मिर्झा. राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, अशोक कानडे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, सलीम शेख, मोहम्मद शेख, माजी नगरसेवक राजेश अलग, राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे आदी उपस्थित होते.
आ. नायकवाडी म्हणाले, आपल्या समाजाच्या विकासासाठी आपल्या विचाराची माणसे सत्तेत जाणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुस्लिम समाजाला सत्तेत प्रतिनिधीत्व दिले. अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टी) ची स्थापना करून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास बाराशे कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुस्लिमांना नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे हे सुध्दा घर्मनिरपेक्ष व पुरोगामी विचारांवर काम करणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे अशा धर्मनिरपेक्ष विचाराच्या नेतृत्वाखालील श्रीरामपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. कानडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सरपंच सागर मुठे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, अजिंक्य उंडे, दीपक निंबाळकर, शब्बीर पटेल, दीपक कदम, सागर कुऱ्हाडे, योगेश जाधव, सोहेल दारूवाला, जमीर पिंजारी, मुदस्सर शेख, इमरान शेख, शाहरुख शहा यांच्यासह मुस्लिम समाजातील बांधव तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.