संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ डॉ. जयश्री थोरात यांच्या युवा संवाद यात्रेचे संगमनेर शहरात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले असून अनेक ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीसह जेसीबीतून फुलांची उधळण करून सुमारे 2000 तरुणांचे जल्लोषमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
नगरपालिकेसमोरून या संवाद यात्रेचा प्रारंभ झाला यावेळी शहराच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, शिवसेनेचे अमर कतारी, सोमेश्वर दिवटे , डॉ.हर्षल तांबे, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री ,गजेंद्र अभंग, विश्वास मुर्तडक ,वैष्णव मुर्तडक, दिलीप पुंड ,अभिजीत पुंड, सोमनाथ मुर्तडक, किशोर पवार, धनंजय डाके, मनोज पुंड, सरपंच निर्मला राऊत ,अंबादास आडेप, श्रेयस करपे, मोहम्मद शेख, वसीम शेख, रिजवान शेख, गौरव डोंगरे, सुरभी आसोपा आदीसह सुमारे 2000 युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा संवाद यात्रेची सुरुवात माळीवाडा येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले स्मारकाला हार घालून सुरुवात केली. युवकांनी ठिकठिकाणी फटाक्याचे आताषबाजी करून यात्रेचे स्वागत केले.
याप्रसंगी डॉ जयश्रीताई म्हणाल्या की, संगमनेर तालुका कायमच शांतता प्रिय आहे. परंतु येथे कोणी येऊन वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. संगमनेर तालुका स्वातंत्र्य सैनिकाचा तालुका आहे. गेली 40 वर्ष या मतदारसंघात आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते पुन्हा नव्यादा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे आहे . जनतेमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे ही निवडणूक संगमनेर तालुक्याच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची असून या निवडणुकीच्या महोत्सवात तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता अत्यंत मोठ्या आनंदाने सहभागी झाला आहे. मोटर सायकल रॅली मधील उत्साह हे सांगतो आहे की तालुक्यातील तमाम युवकांचा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना मोठा पाठिंबा असून मोठे मताधिक्य मिळवण्यासाठी सर्व तालुक्यातील जनतेने काम करावे असे आव्हान त्यांनी केले
तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात हे कधीही निवडणुकीसाठी काम करत नाही. प्रत्येक कुटुंबाचा विकास व्हावा हा त्यांचा ध्यास आहे. निवडणूक संपली की दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात करतात .पाच वर्षे ते आपल्यासाठी काम करतात पुढील पंधरा दिवस आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचे आहे.
तर अमर कातारी म्हणाले की, शिवसैनिक पूर्णपणे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या बाजूने उभा आहे. खेडोपाड्यात घरोघरी जाऊन काम करत आहेत. संगमनेर शहरांमध्ये 24 तास शुद्ध पाणी देणारे आमदार बाळासाहेब थोरात यांचे एकमेव नेतृत्व असून त्यांच्या पाठीशी संगमनेर शहर भक्कमपणे उभे राहणार आहे. येथे गद्दारांना थारा नाही असे सांगताना समोरच्या उमेदवाराने किती पक्ष बदलवले याचा अभ्यास करावा लागेल असेही ते म्हणाले.
यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. अभूतपूर्व जल्लोषात निघालेल्या या रॅलीने संगमनेर करांचे लक्ष वेधून घेतले