नेवासा फाटा (प्रतिनिधी) :- सुरेशनगर येथील हनुमान मंदिर येथे मंगळवार (दि.४) रोजी सकाळी ९ वाजता हनुमान जयंती निमित्त धर्मध्वजारोहनाने ञिदिनात्मक अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख ह.भ.प. शिवाजीमहाराज देशमुख, ञिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज, ऋषीनाथ महाराज,महंत गोपालगिरीजी महाराज, ह.भ.प.नितीनमहाराज हरकळ यांच्यासह सुरेशनगरचे सरपंच कल्याण पाटील उभेदळ,वडाळा बहिरोबा येथील सरपंच ललित मोटे,उपसरपंच सचिन मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मध्वजारोहन मोठ्या धार्मिक व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले यावेळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी मुकिंदपूरचे सरपंच सतिश निपुंगे,सरपंच शंकरराव उंदरे,किशोर सुकाळकर,हंडीनिमगांवचे माजी सरपंच बाळासाहेब साळुंखे,सोनु पिटेकर.सोनू पिसाळ, बाबासाहेब रोडगे यांच्यासह यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भक्त परिवार उपस्थित होता.
सुरेशनगर येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधून ञिदिनात्मक ज्ञानेश्वरी पारायन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याने गावात धार्मिकत्तेचे वातावरण निर्माण होवून या पारायण सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले आहेत.
*पत्रकार श्रीनिवास रक्ताटे*




