पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- निष्ठावान शिवसैनिक उपद्याप करत नाहीत. तुम्ही शिवसेनेचे निष्ठावान म्हणता दुसरीकडे भाजपाचे टेंडर भरता मग तुम्ही कसले निष्ठावान शिवसैनिक ? उध्दव ठाकरे यांना अपमानास्पद पध्दतीने वर्षा बंगल्याबाहेर काढले त्याचा बदला घेण्याची वेळ आलेली असताना तुम्ही बंडखोरी करता असे सांगत खा. नीलेश लंके यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संदेश कार्ले यांचे नाव न घेत हल्लाबोल केला.
निमगाव वाघा येथील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा.शशिकांत गाडे होते. या वेळी माधवराव लामखडे, प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, संपत म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, घनश्याम म्हस्के, बाळासाहेब कोतकर, संजय जपकर, आबासाहेब कर्डिले, शिवा होळकर, पोपट खामकर, एकनाथ झावरे, साहेबराव बोडखे, अजय लामखडे, विद्या भोर, बाळासाहेब गायकवाड, केतन लामखडे, गंगाधर रोहकले, वसंत पवार, अशोक शिंदे, मंजाबापू निमसे,व्ही.डी. काळे, अशोक धनवटे, शंकर साठे, छबु महांडुळे, तुकाराम कातोरे, भाऊराव गायकवाड, बाळासाहेब पानसंबळ, पप्पू कोल्हे, संजय पाटील, विकास रोहोकले, गौरव नरवडे, विलास होळकर, वसंत ठोकळ आदी उपस्थित होते.
लंके म्हणाले, शिवसेनेची व्याख्या मला सांगू नका. माझ्या हातात आजही शिवबंधन आहे. स्वाभिमानी मतदार बंडखोरी खपवून घेणार नाही. हे ठरावीक गावांत फिरतात. लोक बुक्क्याच्या वाहनात नव्हे तर गुलालाच्या वाहनात बसतात. आमच्या व्यासपीठावर निष्ठावान लोक आहे,. असे ते म्हणाले.ही निवडणूक राज्याच्या हिताची आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. आपला उमेदवार विजयी होणारच आहे. फक्त मताधिक्क्याचा प्रश्न शिल्लक असल्याचे सांगत ही निवडणूक फार पुढे निघून गेल्याचे लंके म्हणाले.
२४ तास ३६५ दिवस आम्ही झटतो आहोत, म्हणून जनता आमच्या सोबत आहे, प्रेम करते. आज निवडणूका आल्या म्हणून भुछत्रासारखे ते उगवले आहेत. महायुतीच्या उमेदवारासोबत अनेक जण आपल्यासोबत येण्यासाठी फोन करत आहेत. काहींनी विरोधी उमेदवाराला घोडयावर बसविले. उमेदवारी मिळवून दिली, तेच आता इकडे येण्यासाठी धडपड करत आहेत. कारण बुडत्या जहाजात बसण्यासाठी कोणी तयार नसल्याचे लंके म्हणाले.
म्हशीच्या शिंगात डोकं घालण्यासाठी पैसा मिळत असेल तर डोके घालायला अडचण काय ? हे प्रवरेचे टेंडर आहे. तुम्ही काय शिवसेनेच्या निष्ठा सांगता ? स्वतःला स्थानिक म्हणता मग आम्ही पाकीस्तानी आहोत का ? चार गावांचे तुम्ही टेंडर घेतले काय ? तुमचे नगर तालुक्यात बुथ लागणार नाही. मी डोक्यात घेतले तर ग्रामपंचायत सदस्य होऊ देणार नसल्याचे इशारा खा. लंके म्हणाले.